गरुड विद्यालयातील शिक्षिका सौ ज्योती सूर्यवंशी यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

172

शेंदुर्णी ता जामनेर
येथील धी शेंदुर्णी सेकं. एज्यु. को ऑप सोसायटी द्वारा संचालीत आचार्य ग. र . गरुड माध्यमिक व कनिष्ट महाविद्यालयातील शिक्षिका सौ ज्योती सूर्यवंशी यांच्या ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवे नंतर यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यालयात सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील मुख्याध्यापक एस. पी. उदार सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ट पत्रकार गजानन सूर्यवंशी, उप मुख्याध्यापक ठोके सर , पर्यवेक्षक व्ही व्ही पाटीलसर, जी एस जुंबळे सर , प्रा. व्ही.डी. पाटीलसर यांची उपस्थिती होती. सेवापूर्ती निमित्त विद्यालयाच्या शिक्षकांच्या वतीने सौ सूर्यवंशी यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करून गौरव करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक कै.आचार्य बापु साहेबांच्या आणि कै आण्णासाहेब भास्करराव गरूड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षीका सौ सुजाता भदाणे मॅडम यांनी केले. प्रास्ताविक डि बी पाटील सर यांनी तर आभार डि आर पाटील सर यांनी मानले. विद्यालयातील शिक्षक कलेश गरुडसर, शिक्षिका सौ. कौमुदीनी गरुड मॅडम यांनी सौ सुर्यवंशी यांच्या प्रदिर्घ काळातील आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांमध्ये ज्येष्ट पत्रकार गजानन सूर्यवंशी यांनी कै. आचार्य बापुसाहेब आणि कै आण्णासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत संस्थेच्या वाटचालीचा इतिहास सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस पी उदारसर यांनी मनोगत व्यक्त करीत भावी वाटचालीस शुभच्छा दिल्या. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते.

तसेच, जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या वतीने सेवानिवृत्ती नंतर राजीनामा दिल्या नंतर पतपेढीकडे असलेल्या शेअर्स व वर्गणी रकमेचा चेक पतपेढीचे संचालक श्री आबा पाटील सर यांनी कार्यक्रमात प्रदान केला.