समाजसेवक सुमित पंडित यांना “महात्मा गांधी” दर्शन पुरस्कार जाहीर

312

 

लोहारा ( दिनेश चौधरी ) सुमित यांचे समाजउपयोगी विविध 41 उपक्रम राबवत तरुणांसाठि ठरलेआदर्श

आनंदश्री ऑर्गेनाजेशन आय टी एज्यूकेशन ट्रस्ट आयोजित राज्यस्तरीय व राष्ट्रीय २०२०
पुरस्कार वितरण सोहळा पीस कॉन्फ्रेंस “महात्मा गांधी” दर्शन पुरस्कार या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाऱ्या औरंगाबाद येथील माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित यांना महात्मा गांधी दर्शन पुरस्कार जाहीर करन्यात आला आहे.कार्यक्रमाचे मुख्य संयोजक समिती आनंदश्री फाउंडेशन यानीं पुरस्कार जाहीर झाल्याचे निवडपत्राद्वारे कळविले आहे.यात कला, क्रीडा,साहित्य, शैक्षणिक, सामाजिक,अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रिफळ व आकर्षक प्रमाणपत्र व गांधी सन्मानचिन्ह ( महात्मा गांधी ४” COIN ) देऊन गौरवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक:-पद्मश्री डॉ विजय कुमार शाह,डॉ संगीता नाईक, गांधी फिलॉसॉफर,मा.श्री. लक्ष्मण गोळे.गांधीवादी आदि मान्यवर उपस्थित राहनार आहे,
“महात्मा गांधी”दर्शन पुरस्कारामुळे समाजात सुमित पंडित त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सुमित चा हा ५६ वा पुरस्कार आहे.या आधी त्यांना विविध ५५ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार सोहळा दि. १०/१२/२०२० रोजी मुंबई येथे सांय ०३:३० वा पुरस्कार वितरण सोहळा.होनार आहे अशि महिती आयोजक आनंदश्री फाँडेशंन यांच्या वतीने आली आहे.