पहुर पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे साहेब यांचे शेंदुर्णी गरुड विद्यालयात सायबर क्राईम या विषयावर समुपदेशन

142

प्रतिनिधी शेंदुर्णी:- आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी विद्यालयात सायबर क्राईम या विषयावर समुपदेशन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे प्रेरणास्थान कै. बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. या नंतर आलेले मान्यवर पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अरुणजी धनवडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच या नंतर संस्थेच्या संचालिका देवश्री काशीद याचा सत्कार मुख्याध्यापक एस.पी.उदार यांनी केला. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.पी.उदार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व कार्यक्रम ठेवण्या मागचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. त्यानंतर या कार्यक्रमाची प्रमुख मान्यवर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे सांगितले, तसेच विद्यार्थ्यांनी आपले भावी आयुष्य कसे जगावे, तसेच विद्यार्थ्यांना व्यायाम करण्याचे महत्त्व सांगितले, त्याचप्रमाणे फसव्या जाहिरातींना किंवा कॉल्सला बळी पडू नका व आपला ए.टी.एम पिन किंवा ओ.टी.पी हा कोणालाही देऊ नका. कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी असा सल्ला यावेळी दिला. यानंतर अध्यक्षीय भाषण संस्थेच्या संचालिका देवश्री काशीद यांनी केले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशे मध्ये आपलं ध्येय निश्चित कसे करावे या बद्दल सांगितले, या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये संस्थेच्या संचालिका देवश्री काशीद, पोलीस उपनिरीक्षक अरुण धनवडे,मुख्याध्यापक एस.पी.उदार, उपमुख्याध्यापक ए.बी.ठोके, विज्ञान विभागाचे ज्येष्ठ प्रा. व्ही.डी.पाटिल, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख प्रा. एस बी.शेळके,प्रा.आप्पा महाजन, विज्ञान प्रमुख प्रा.संजय पाटील, ज्येष्ठ शिक्षक बी.एम. कुमावत,जी.टी कुमावत तसेच सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी.पाटील यांनी केले तर आभार डी बी.पाटील यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये शासनाने घालून दिलेल्या कोरोन संदर्भात नियमांच पालन करण्यात आले व कार्यक्रम संपन्न करण्यात आला.