“लोहारा परिसरात गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस”

274

दिनेश चौधरी लोहारा (प्रतिनिधी ) लोहारा येथून जवळच असलेल्या कळमसरा येथे काल दि.18रोजी संध्याकाळी चार वाजेला विजेच्या कडकडाटांन सह व ढगांच्या गडगडात जोरदार वादळी वाऱ्या सह पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीट झालेली बघायला मिळाली. कळमसरा येथील शेतकरी संजय शांताराम उशीर (गट नंबर ४३) यांच्या शेतात झालेल्या गारपिटिने सोलर पॅनलला अक्षरशः छिद्रे पडले. परीसरात उभे असलेले गहु, ज्वारी, दादर, सुर्यफुल, मका, हरभरा, पालेभाज्या ही पिके जमीन दोस्त झाली. मार्च मध्ये सुरू असलेल्या बेमोसमी पावसामुळे पिकांचे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरवला आहे. आधीच शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, त्यात काढनीला आलेली सर्व पिके हातातून निघून जात आहे. या मुळे शेतकरी वर्ग निरशेत आहे.
त्यामुळे तातडीने नुकसान झालेल्या परिसराचे तात्काळ पंचनामे करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.