कासोदा भागात वाळूच्या अवैध उत्खननावरून एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून

1126

प्रतिनिधी पाचोरा जि. जळगाव 

जळगाव जिल्ह्यातील कासोदा भागात वाळूच्या अवैध उत्खननावरून एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सचिन ( उर्फ सोनू) देविदास पाटील, रा अंतुरली न. ३ असे मृतकाचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यासह पाचोरा भडगाव एरंडोल कासोदा या भागात वाळू माफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मात्र या वाळू माफियांवर जळगाव जिल्ह्यातील कोणत्याही अधिकाऱ्यांचा सत्ताधारी मंत्री खासदार आमदार याचा अजिबात वचक राहिलेला नाही. याचा गैरफायदा घेत वाळू माफिया महसूल विभागाच्या व काही पोलीस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हप्तेच्या जोरावर रात्री वाळू चोरटी करून रात्रंदिवस बिनधास्त वाहतूक करत असतात,याच वाळू व्यवसायातुन एकमेकांच्या खुन्नसीमुळे आज एका वाळू व्यवसायिकाला आपले प्राण गमवावे लागले आहे.त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून खून झालेल्या मयताच घटनास्थळावरून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मयतास जळगाव ग्रामीण रुग्णालयात पीएम रिपोट साठी पाठविण्यात आले. पाचोरा ग्रामीण रुग्णालयात खून झालेल्या सोनू दाखल होताच पाचोरा व भडगाव तालुक्यातील आणि अवैध धंदे करणाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात प्रचंड गर्दी जमवलेली होती. या घटनेचा पोलीस प्रशासन तपास करीत असून त्यानुसार गुन्हा दाखल करणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे .