लोहारा येथे जि. प. मराठी मुलाच्या शाळा खोल्या भूमिपूजन सोहळा संपन्न

499

दिनेश चौधरी,लोहारा ( प्रतिनिधी ) गेल्या कित्येक वर्षांपासून लोहारा येथील बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद मराठी मुलाच्या शाळा खोल्याचे आज दि.24 रोजी मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सदर
जि.प.शाळा खोल्याच्या बांधकामासाठी पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी १० खोल्यासाठी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. आज रोजी जिल्हा परिषद शाळा खोल्याच्या बांधकामाचे भूमिपूजन जि.प.सदस्य भाऊसाो, मा.दिपकसिंग राजपूत यांच्या हस्ते ,शेतकरी सेना जिल्हा प्रमुख भाऊसो अरूण पाटील ,लोहारा येथील सरपंच भाऊसाो अक्षय जैस्वाल याच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.त्यावेळी युवकांचे प्रेरणास्थान व प्रतिष्ठित व्यापारी राहुलशेठ कटारिया , लोहारा येथील मुलुख मैदान तोफ व ग्रा.पं. सदस्य ईश्वर भाऊ देशमुख, आदर्श शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते सुरेश गरबड चौधरी,आबा चौधरी, सुरेश मोरे,हिरालाल जाधव,अर्जुन डांबरे, शिवसैनिक दिनकर गिते, लक्ष्मण बाविस्कर ,कौतिक शिंदे, संभाजी लिंगायत, सुभाष देशमुख पटेल सर, दिलीप गायकवाड, नाना डांबरे सुरेश भिल ईस्राईल शेख रज्जाक दादा गफ्फार मिस्तरी, ईश्वर खरे ,भगवान खरे,आणि पत्रकार बंधू व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.