पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांचा एकुलती ग्रामवासियांशी सुसंवाद

449

प्रतिनिधी एकुलती ता. जामनेर –  पहूर पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले जन प्रिय पोलीस निरीक्षक अरूण धनवडे आपल्या शारिरीक तंदुरुस्ती बाबतीत कायम सजग असतात. बोलून नव्हे तर कृती तून दाखवून देतात. याचा प्रत्यय आला आज एकुलतीकरांना.. भल्या सकाळीच साहेबांनी रनिंग करत ६ किमी अंतरावरची एकुलती गाठली. अत्यथशील असलेल्या गावकऱ्यांनी साहेबांचा यथोचित सन्मान केला. यावेळी अरूण धनवडे यांनी स्वच्छता राखण्याचे महत्त्व, परस्परांशी सौहार्दाची वागणूक, सणासुदीला सामंजस्य व शांतता राखणे , व्यसनांपासून दूर राहत शरिरबळ वाढविणे याबाबत मौलिक संवाद साधला. धनवडे यांच्या या आकस्मिक व अनौपचारिक भेटीने गावकरी भारावले. या प्रसंगी संजय पाटील सर, दत्तू पाटील, भीमराव कडू पाटील आणि अनेक तरुण उपस्थित होते.