शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयास शैक्षणिक गुणवत्तेकरिता दुसऱ्यांदा आयएसओ मानांकन

736

प्रतिनिधी ….

शेंदुर्णी ता. जामनेर :  अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शेंदुर्णी यास गुणवत्ता व्यवस्थापन पद्धती (क्वालिटी मॅनॅजमेण्ट सिस्टिम) अंतर्गत आयएसओ 9001:2015 हे मनांकन इंग्लंड येथील ब्रिट क्वालिस सर्टिफिकेशन (युके) लिमिटेड, लंडन या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी महाविद्यालय आयएसओ 9001:2008 सर्टिफिकेशन नुसार मानांकित केले गेले होते.

गरुड महाविद्यालय, दुसऱ्यांदा मानांकनाकरिता सामोरे जाण्यापूर्वी महाविद्यालयास 2015 आणि 2018 साली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक आणि गुणवत्ता ऑडिट मध्ये ‘अ’ दर्जा आणि 2017 विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार (उत्तेजनार्थ) प्राप्त करत विद्यापीठ परिक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालयाच्या यादीत स्थान प्राप्त केले यासह दरवर्षी भारत सरकारच्या माध्यमातून शिक्षण मंत्रालयामार्फत नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मधील सहभाग, उद्योग पुरस्कृत उपक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, महाविद्यालयाचे ग्रीन ऑडिट, एनर्जी ऑडिट, एनव्हायरनमेंट ऑडिट, कार्बन ऑडिट, जेन्डर ऑडिट मधील सहभाग आणि त्याचे प्रमाणिकरण यासह महाविद्यालयातील ई-गव्हर्नन्स, महाविद्यालयातील विभागनिहाय गुणवत्तापूर्ण दस्तऐवज, अहवाल तसेच न्याकचे तिसऱ्या सायकलचे मूल्यांकन आणि त्यातील वृद्धिंगत झालेला बी प्लस दर्जा याअनुषंगाने महाविद्यालय आणि महाविद्यालयीन विभाग, विविध समित्या, प्रयोगशाळा, संगणक विभाग, कार्यालय, विद्यार्थी आणि समाज उपयोगी उपक्रम आणि त्याची गुणवत्ता याआधारावर ऑनलाईन मूल्यांकन करून महाविद्यालयाला गुणवत्ता व्यवस्थापन पद्धती अंतर्गत पुढील 3 वर्षाकरिता वार्षिक आढावा घेण्याच्या आधीन राहून आयएसओ मनांकन दिले गेले.

महाविद्यालयाच्या या गुणवत्तापूर्ण कामगिरीकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. श्याम जीवन साळुंखे यांनी आयएसओ कार्यप्रणाली समन्वयक म्हणून भूमिका बजावली, त्यांच्याच नेतृत्वात महाविद्यालयाचे यशस्वी न्याक पुनरमूल्यांकन आणि आता आयएसओ मनांकन म्हणून महाविद्यालयाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला याकरिता धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री दादासाहेब संजयजी गरुड, सचिव श्री. दाजीसाहेब सतिश चंद्र काशिद, सहसचिव श्री भाऊसाहेब दीपकजी गरुड, संचालिका सौ. उज्वलाताई काशिद, ज्येष्ठ संचालक श्री सागरमलजी जैन, श्री. यु. यु. पाटील, वसतिगृह सचिव श्री कैलास देशमुख आणि पदाधिकारी यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील, समन्वयक डॉ. श्याम साळुंखे आणि महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक करून अभिनंदन केले.