नारायण सेवा संस्थान उदयपूर राजस्थान कडून शेंदुर्णी तील पत्रकारांचा गौरव

150

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी  – येथे आज नारायण सेवा संस्थांच्या वतीने मोफत अपंग दिव्यांग अन करता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने आलेल्या संस्थांच्या मान्यवरांकडून शेंदुर्णी येथील विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा उल्लेखनीय कामाबद्दल गौरव करण्यात आला.
नारायण सेवा संस्थान उदयपूर चे शिबीर प्रमुख हरिप्रसाद लड्डा उदयपूर यांनी तरुण भारत चे पत्रकार अतुल जागीरदार, लोकमतचे दीपक जाधव, सकाळचे योगेश सोनार ,सामना वृत्तपत्राचे श्रीकृष्ण चौधरी , दिव्य मराठीचे पत्रकार डॉ नीलम कुमार अग्रवाल, पुण्यनगरीचे पत्रकार विलास अहिरे ,देशदूतचे पत्रकार दिग्विजय सूर्यवंशी ,स्टार एटीन न्यूज चे संपादक हमीद शेख, टाळ विना साप्ताहिकाचे संपादक सुनील गुजर ,व्हॉइस ऑफ इंडियाचे पत्रकार प्रवीण कापुरे ,पुण्य प्रताप चे पत्रकार संतोष महाले, लोकशाहीचे पत्रकार एडवोकेट देवेंद्र पारळकर, गल्ली मैदान चे पत्रकार रवींद्र गुजर व इतर वृत्तपत्राचे पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी अग्रवाल समाज अध्यक्ष गोविंद अग्रवाल, उपाध्यक्ष डि.के. अग्रवाल, बालमुकुंद अग्रवाल ,राजेंद्र अग्रवाल ,सुनील शिंपी,मनोज अग्रवाल शुभम अग्रवाल ,संजय पवार, नरेंद्र विसपुते, नारायण सेवा संस्थान चे शिबीर प्रमुख हरिप्रसाद लड्डा व इतर मान्यवर उपस्थित होते.