युक्रेन मध्ये अडकलेल्या म्हसास चा विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतला

775

दिनेश चौधरी, लोहारा. (प्रतिनिधी) लोहारा येथून जवळच असलेल्या म्हसास, ता.पाचोरा येथील डॉ.राजेंद्र सिताराम पाटील व छाया राजेंद्र पाटील ह्यांचा मुलगा आयुष हा युक्रेन मधील चरनिवीसी सिटी मधील बी.एस .एम युनीवरसिटि मध्ये एम.बी.बी.एस.च्या शिक्षणासाठी गेला होता, तरी तो दिनांक २५/०२/२०२२ रोजी सुखरूप मायदेशी परतला, युक्रेन व रशिया वाद विकोपाला गेला असुन, युद्ध सुरू आहे, या दोन्ही देशातील युद्ध जन्य परीस्थिती किती दिवस राहणार हे सांगता येणार नाही,आयुष याने सांगितले की, युक्रेन मधील परीस्थिती खूप भयावह, विध्वंस करणारी आहे, तिथे असलेल्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत, तसेच आम्हाला नोटीस द्वारे सांगण्यात आले की, रशिया कडुन केव्हाही हमला होवू शकतो, तरी आपण आपल्या मायदेशी परत जावे, वेळेचे नियोजन व भान ठेवून आयुष किव ह्या विमानतळावरुन येथुन विमानाचे स्वतः तिकीट बुक केलं व मायदेशीचा रस्ता पकडला, डॉक्टर होण्याचे स्वप्न जरी अपुर्ण राहिले तरी “जान है तो जहान हैं”अश्या शब्दांत आयुष,आई वडिलांनी व नातेवाईकांनी मायदेशी परतल्याचा आनंद व्यक्त केला.