मेणगाव येथील सुधाकर चौधरी हे पोस्ट विभागातून सेवानिवृत्त. शेंदुर्णी पोस्ट ऑफिस येथे सत्कार व निरोप

419

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) शेंदूर्णी येथून जवळच असलेल्या मेनगाव या छोट्याश्या गावातील आदर्श व्यक्तिमत्त्व असणारे श्री सुधाकर सोनजी चौधरी हे आज दि.31 मे रोजी पोस्ट विभागातुन आज आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले आहे, त्यांनी मेणगाव ,येथुन पोस्ट विभागाच्या सेवेला सुरवात केली होती, आज अखेर 43 वर्षांनंतर ते सेवानिवृत्त झाले.    म्हणून त्याचा शेंदुर्णी पोस्ट ऑफिस येथे सत्कार करून निरोप देण्यात आला .
10 जून 1979 या दिवशी ते पोस्ट विभागात मेगगाव,ता.जामनेर येथे रुजू झाले,3 रुपये प्रतिमहिना या वेतनावर त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. घरची परिस्थिती अगदी बेताचीच असल्याने त्यांनी या कामास होकार दिला. जिद्द आणि चिकाटी होतीच, मात्र या जेमतेम पगारावर कुटुंबाचे उदरनिर्वाह चालत होता. मात्र आम्हां लहान भावंडांच शिक्षण त्यांना करायचे होते,त्यांना आम्हां लहान भावांची भविषयाची चिंता सतावत होती, मग त्यांनी त्या वेळेस गावातील सरदारबेग यांच्या वित भट्टीवर काम केले, तर काही वर्षे मजुरी केली,
अत्यत बिकट परिस्थितीत त्यांनी कुटूंबाला खूप मोठा आधार दिला, पोस्ट विभागात काम करतांना त्यांनी अतिशय प्रामाणिक पणे काम केले.ऊन ,वारा, पाऊस याची पर्वा न करता ते बिलवाडी येथे पत्र वितरण करायला जायचे,तेथून शेंदुरणी, आणि पुन्हा मेणगाव असा त्यांचा नेहमी सायकलवर आजपर्यंत प्रवास केला,रोज सायकलवर ते जवळपास 25 किलोमीटर फिरायचे, अगदी न थकता. आज वयाच्या 64 व्या वर्षीही तरुणाला लाजवेल अश्या जोमाने पोस्टाची कामे करायचे,
आज काही मान्यवरांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला. या वेळी शेंदुर्णी पोस्ट ऑफिस चे कर्मचारी अधिकारी तसेच धी शेंदुरणी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक आदरणीय दादासो,यु.यु,पाटील (सर ) आदरणीय अशोकजी भारुडे साहेब, स्टार न्यूजचे संपादक हमीदभाई, उपसंपादक श्री निलमकुमार अग्रवाल, मेणगाव येथील सरपंच शरीफ भाई तडवी,उपसरपंच व जगविख्यात सिंगर गणेशजी पाटील, माजी सरपंच व कृषिभूषण श्री सुरेश पाटील, युवा नेते विलास पाटील, कविवर्य हरी भाऊ महाजन, प्रकाश मोहन,अशोक पाटील, भाऊराव पाटील इ.सह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
—————————————-

विशेष ….. मेनगाव येथे ग्रा .प .व ग्रामस्थां कडून सत्कार व निरोप समारंभ 

 मेणगाव निवासीयांसाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आज घडली आहे,

तसे पाहिले तर आनंद ही आहे,
अन दुःख ही,

आनंद या गोष्टीचा आहे की अत्यंत बिकट परिस्थितीत सुद्धा ज्या माणसाने जिद्दीने काम करून या देशाला आपल्या सेवेने प्रभावित केले, ज्या काळी सायकल नव्हती,पायी फिरून यांनी घरोघरी जाऊन यांनी पोस्ट कार्ड आम्हां गाववासीयांना दिले.

जेव्हा मोबाईल, फोन, ह्या गोष्टी नसताना घरोघरी जाऊन सुखाचे-दुःखाचे पत्र पोहचविले,

आज ते पत्र च सेवेतून निवृत्त झाले,

आपल्या गावातील अगदी मनमिळावू नेतृत्व, श्री सुधाकर सोनजी चौधरी,
हे आपल्या पोष्ट सेवेतून आता 43 वर्षाची अवितरत सेवा देऊन निवृत्त झाले,
या आनंदात त्यांच्या सोबत पूर्ण मेणगाव सहभागी आहे,
आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक
तसेच माजी सरपंच
श्री.सुरेश भाऊ पाटील,
श्री. यु. यु. पाटील सर.
तसेच जगप्रसिद्ध सिंगर श्री गणेश पुंडलिक पाटील,
श्री . प्रकाश काशीराम मोहणे
श्री. विलास भाऊ पाटील,
सरपंच श्री, शरीफ भाऊ तडवी,
श्री भाउराव नवलसिंग पाटील..
तसेच मेणगाव ग्रामपंचायत
व पूर्ण मेणगाव गावाला

श्री सुधाकरभाऊ सोनजी चौधरी साहेब.
आपला अभिमान आहे,
व आपला सन्मान असाच आमच्या मनात निरंतर राहील.
                                                                                  कवी—हरी भाऊ महाजन,मेणगाव.