शेंदुर्णीत 76 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोफत हृदयरोग तपासणी

391

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – येथील कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ व हार्ट प्लस केअर हॉस्पिटल जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पारस मंगल कार्यालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मोफत हृदयरोग तपासणी व इतर रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या वेळी 76 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. यात जळगाव येथील हॉट केअर हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. संदीप भारुडे तसेच डा. अतुल सोनार यांच्या टीमने रुग्णांची तपासणी केली. तपासणी करता त्यांचे सोबत डॉ शुभम पाटील, डॉ रवींद्र रागडी, विनोद चव्हाण ,सोजब खाटीक, प्रशांत सोनार यांनी सहकार्य केले.
यात हर्द्य दाब ,रक्त तपासणी, हृदयाची कार्यक्षमता, हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल, लिपिड प्रोफाइल ,हृदयाची सोनूग्राफी, आदी तपासण्या करण्यात आल्या. यावेळी बोलताना डॉ .संदीप भारुडे यांनी सांगितले की कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांनी जळगावला माझ्या रूग्णालयात आल्यावर नाममात्र दरात तपासणी करण्यात येईल. तसेच ह्या वयात पाळावयाची पथ्ये, करावयाचे व्यायाम, खाण्यापिण्याची पद्धती यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
कृतार्थ ज्येष्ठ सेवानिवृत्त नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक भारुडे तसेच विश्वस्त गजानन अस्वार, पांडुरंग जाधव, विकास सपकाळे,यु. यु .पाटील. पी. डी. पाटील, दिनकर चौधरी,दिनेश भारुडे व इतरांनी उपक्रमासाठी सहकार्य केले व परिश्रम घेतली.