सोयगाव येथे वधू वर परिचय मेळावा संपन्न

422

औरंगाबाद सप्तपदी पुस्तकाचे प्रकाशन औरंगाबाद शहरात प्रथमच

प्रतिनिधी सोयगाव – श्री गणेश भिकनराव मढीकर यांनी आयोजित केलेल्या वधू-वर परिचय मेळाव्याचे सप्तपती पुस्तकाचे सोयगाव येथे प्रकाशन करण्यात आले.यावेळी शेगाव येथील समाज बांधव श्री.अशोक रोकडे, ज्येष्ठ समाजसेवक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.याप्रसंगी परीट समाजाचे तालुका अध्यक्ष श्री गोकुळ रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले भविष्यात होणाऱ्या राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्यात सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे मंडळाच्या वतीने आव्हान करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव श्री राजेंद्र रोकडे सर यांनी केले सूत्रसंचालन श्री कृष्णा शेवाळकर यांनी केले.तर आभार श्री विकास रोकडे यांनी केले याप्रसंगी श्री प्रदीप रोकडे यांच्या हस्ते सप्तपदी नाव नोंदणी केलेल्या समाज बांधवांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले सदर प्रकाशन सोहळ्यास श्री भिकन रोकडे, योगेश रोकडे, सुनील रोकडे, अनिल निकम, दिनेश निकम, धर्मेंद्र रोकडे, अशोक महाले यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.