सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या मनमानी कारभाराला कंटाळून शेंदुर्णीकरांचा रस्ता रोको चा इशारा

577

शेंदुर्णी आऊट पोस्टला नोंदवली तक्रार.
शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी  – शेंदुर्णी येथील स्टेट बँक ते मोहम्मदया अग्लो उर्दू शाळेपर्यंतचा सोयगाव रोडवरील रस्त्याचे काम तब्बल पाच वर्षापासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर यांनी हाती घेतले आहे .परंतु ते पूर्णत्वास नेत नसल्याने कंटाळून शेंदुर्णीतील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की अवघे दोन किलो मीटरचा शेंदुर्णीतून जाणारा सोयगाव रस्ता हा सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी खोदून ठेवलेला आहे. जागो जागी मातीचे ढिगारे असून ठिकठिकाणी गड्डे खोदून ठेवलेले आहे. गेल्या पाच वर्षापासून असाच काही ना काही काम करण्याचा हट्टहास केला जातो. परंतु तो पूर्ण होत नसल्याने वाहतुकीला रहदारीला अडथळा होतो. गेल्या वर्षभरापासून शेंदुर्णी धार्मिक कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असल्याने भाविकांची आवाजावी सुरू असते. परंतु त्यांच्या होणाऱ्या त्रासात संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सदर रस्त्यांवर शाळा, मंदिर, मज्जिद, मंगल कार्यालय, निवासी घरे आहेत .या सर्व गोष्टींचा त्रास भाविकांना, वाहतूकदारांना, रुग्णांना, वयोवृद्ध लोकांना तसेच शाळेत गरीब विद्यार्थ्यांना होतो .
सदर रस्त्याचे काम आठ तारखेपर्यंत पूर्ण झाल्यास 8 फेब्रुवारी, बुधवारी सकाळी नऊ वाजता शेंदुर्णी कर रस्ता रोको आंदोलन करणार आहे. त्यासंबंधीचे पत्र त्यांनी शेंदुर्णी पोलीस स्टेशन, तहसीलदार जामनेर तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर यांना दिले आहे.व संबंधीत वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे पोस्ट ने निवेदन पाठविले आहे .
संबंधित सर्व विभागाला दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पत्रावर फरीद शेख ,शेख हमीद, वाहिद अली ,शकूर शेख, जुबेर शेख, नरेंद्र विसपुते, आदर्श बारी, रवी पाटील ,विक्रम बडगुजर, लक्ष्मण वाघ, रवींद्र गुजर, शेख खालीद, फिरोज खान. शेख अब्रार ,हन्नान खान, शेख शफीक ,शेख शाहरुख ,शेख निसार, साहिल शेख ,जुबेर शेख इफ्रान कुरेशी, शेख शरीफ, एकलाक कुरेशी, शकूर शेख, जुबेर शेख ,रईस शेख, आदी 200 लोकांच्या सह्या आहेत.