जन्म भुमितील सत्काराने भारावलो – सरकारी वकील सुरेंद्र काबरा

735

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी
माणुस किती कतृत्ववान आहे,किती मोठे आहे हे जन्मभुमीत आपल्या माणसांनी आपल्या माणसाचे केलेल्या कौतुकावरून कळते. जन्म भुमित झालेल्या सत्काराने भारावलो असल्याची प्रतिकिया जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी माहेश्वरी समाजातर्फे नागरी सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले.
पुढे अॅड काबरा यांनी जुन्या आठवनींना उजाळा दिला.आपल्या आई वडिलांच्या आठवणीने त्यांचे डोळे भरुन आले होते.शेंदुर्णी नगरीचे माझ्या जडणघडणीत मोठा वाटा असुन शेंदुर्णीकर म्हणुन मला अभिमान असल्याचे प्रतिपादन करत सत्कारामुळे मी भारावलो असुन आयुष्यभर ऋणात राहणार असल्याचे सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान महेश यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने महेश वंदना सादर करण्यात आले.
यासोबत गावातील प्रमुख मान्यवर संजय गरूड, उत्तम थोरात, गोविंद अग्रवाल, सतिषचंद्र काशिद, अमृत खलसे, सागरमल जैन, डॉ विजयानंद कुलकर्णी, पंडीत जोहरे, अरुण जोशी,अॅड देवेंद्र पारळकर आदींनी मनोगत व्यक्त करत सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला तसेच शुभेच्छा दिल्या.
महेश्वरी समाजाच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजमल नवाल , हिरालाल काबरा, पन्नालाल झवर , रमेश काबरा, शेंदुर्णी माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष दिनेश झवर शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा सौ.विजया ताई खलसेआणि समाजाचे सन्माननिय बांधव भगीनी आदींच्या हस्ते अॅड. सुरेंद्र काबरा व सौ निशा काबरा यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आले. या सत्कार प्रसंगी अॅड काबरा यांचा परिवार उपस्थीत होता.
गावातील नागरीकांच्या वतीने,विविध संस्था, यांच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि वैयक्तीक सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय काबरा, प्रास्ताविक अॅड प्रविण झवर , आभार समाजाचे अध्यक्ष दिनेश झवर यांनी मानले. त्यानंतर सर्वांनी स्नेह भेजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहेश्वरी समाज युवकांनी परीश्रम घेतले.