पत्रकारास फोन वर धमकी,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन

120

 

जळगाव(प्रतिनिधी जावीद शेख) प्रभागा मधील अविकसित तथा न झालेल्या कामाचा स्थानिक नागरिकांच्या तक्रारी वरून वाचा फोडणाऱ्या पत्रकारास अमळनेर येथे नगरसेवकाकडून फोन वरून मारण्याची धमकी,पत्रकार संघटना आक्रमक नगरसेवकावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणी चे निवेदन चाळीसगांव शहर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.अमळनेर येथील दिव्य लोकतंत्र वेब न्यूज चॅनल/पोर्टल चे संपादक श्री समाधान मैराळे यांनी आपल्या चॅनल/पोर्टलच्या माधमातून नपा क्षेत्रातील प्रभागा मधील अविकसित तथा न झालेल्या कामाचा स्थानिक नागरिकांच्या तक्रारी वरून व प्रत्यक्षदर्शी समस्यांचे अवलोकन करून नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वाचा फोडल्याचा राग येऊन नगरसेवक संतोष पाटील उर्फ भुऱ्या आप्पा यांनी श्री समाधान मैराळे यांना भ्रमणध्वनी द्वारे मारण्याची धमकी देऊन खोट्या गुन्ह्यातअडकविण्याची धमकी देऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ अर्थात पत्रकारितेचा गळा घोटण्याचा प्रकार केला आहे. सदर बाब ही गंभीर असल्याने राज्य शासनाने पत्रकारांना सरंक्षण कवच म्हणून पत्रकार संरक्षण अधिनियम कलम ४ अस्तित्वात आणला असून या कायद्या नुसार सदर नगरसेवकावर गुन्हा दाखल करून लोकशाही वाचवावी. आपण तसे न केल्यास राज्यव्यापी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून या घटणे विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल,याची कृपया नोंद घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ चाळीसगांव तालुक्याच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक के के पाटील यांना देण्यात आले निवेदनावर तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी,पत्रकार गफ्फार शेख,आनंद गांगुर्डे,रणधीर जाधव,राहुल नकवाल,अनिस शेख,सोजीलाला हडपे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.