पिंपंळगाव हरे येथील जिओ मार्ट मोबाईल शॉप मधून दोन लाख बारा हजार रुपये चोरी

162

पाचोरा (प्रतिनिधी जावीद शेख ) पिंपंळगाव (हरे) येथील विघ्नहर्ता चौका जवळील जिओ मार्ट मोबाईल शॉपच्या जिओ पॉईंट लिडर अभिजित यशवंत मस्के यांच्या फिर्यादी नुसार 04/08/22 रोजी रात्री चोरी झाली. त्यात दोन लाख बारा हजार रुपये चोरीस गेले असून. त्याचा बरोबर जिओच्या फोन बॅटरी, राउटर, स्मार्ट फोन व लॅपटॉप चोरीस गेले असून त्या विरोधात पिंपंळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अज्ञात विरोधात भादंवी प्रमाणे 454/457/380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पी.एस.आय पवार यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास करीत आहेत.