पहूर येथील सराफा व्यापाऱ्याचा संशस्यास्पद मृत्यू

770

 

दिनेश चौधरी लोहारा – पहूर येथील सराफा व्यापाराच्या संशयास्पद मृत्यूने पहूर गावावर शोककळा पसरली आहे
पहूर कसबे तालुका जामनेर येथील पूनमचंद गुलाबचंद वर्मा वय 42 यांचे लोहारा तालुका पाचोरा येथे मेघराज ज्वेलर्स या नावाने सोन्या चांदीचे दुकान असून ते आज आपले दुकान बंद करून नेहमीप्रमाणे सायंकाळी सात वाजता लोहारा येथून पहुरकडे येत असताना गोगडीच्या पुलाजवळ रक्तबंबळा अवस्थेत मयत स्थितीत आढळून आल्याने पहूर सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर मयत व्यक्तीची जवळ असलेली बॅग व मोबाईल हे दोघे गायब असल्याची चर्चा आहे. मात्र सदर व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद असून हा अपघात आहे की काही घातपाताचा प्रकार आहे हे मात्र अद्याप या गोष्टीचा उलगडा झाला नाही त्यामुळे सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे .मयत पूनमचंद गुलाबचंद वर्मा यांच्या पश्चात आई, पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी, व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरापर्यंत सदर घटनेचा गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.