दुर्गा विसर्जन मिरवणूक दरम्यान शेंदुर्णी गावातील रेकॉर्ड वरील 22 जण दोन दिवससाठी हद्दपार

583

 प्रतिनिधी शेंदुर्णी ता.जामनेर – पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदुर्णी दुरक्षेत्र हद्दीत शेंदुर्णी गावातील सामनेवाले यांच्या कडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, दुर्गा उत्सव विसर्जन शांततेत पार पडावा याकरिता पोलीस स्टेशन च्या रेकॉर्ड वरील सामनेवाले 1)अजय ईश्वर कोळी 2)गोरख बापू पाटील 3)अनिल विठ्ठल पाटील 4)गोविंद अमृत बारी 5)गुड्डू सबर खाटीक 6)एजाज शमसुद्दीन खाटीक उर्फ अयफाज 7)तौफिक अली लियाकत अली उर्फ लढया 8)शैहबाज तय्यबा बागवान 9)रफिक रशीद खाटीक 10)आकाश प्रकाश गवळी 11)प्रकाश राजू भोई 12)विक्रम भिका माळी 13)समाधान बळीराम पाटील 14)राहुल जगन्नाथ धनगर 15)विक्की सुभाष ढगे 16)अनिल बाबुराव बारी 17)शेख दानिश शेख जैय्यनुदीन  18)जुबेर शेख याकुब 19)अनिल विठ्ठल कोळी 20)जगन कैलास धनगर 21)न्यानेशोर कैलास धनगर 22)आदिल शेख रशीद , सर्व राहणार शेंदुर्णी यांना CRPC 144 (2)प्रमाणे प्रस्ताव मा.पोलीस अधिक्षक सो. पो. नि. प्रतापराव इगले सो. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक दिलीप पाटील सो. सहा. पोलीसउपनिरीक्षक शशिकांत पाटील पोहेकॉ. प्रशांत विरणारे ,पोना गणी तडवी ,पोकॉ. प्रशांत बढगुजर ,पोकॉ. संदीप पाटील पोकॉ.विजय कुमार पाटील ,पोकॉ.विकास गायकवाड शेंदुर्णी पो.दुरक्षेत्र अशांनी प्रस्ताव तयार करून मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सो.भाग पाचोरा भारत काकडे यांच्या कडे पाठविण्यात आला , त्यांच्या मार्फत शिफारस करून मा.उप विभागीय अधिकारी सो.जळगाव भाग यांच्या कडेस प्रस्ताव पाठविण्यात आला असता त्यांनी वर नमूद सामनेवाले यांना दि.5/10/22 चे 20.00 वा. ते दि.7/10/22 चे 24.00 वाजे पावेतो शेंदुर्णी गावात तसेच राहत असलेल्या हद्दीत प्रवेश करण्यास हद्दपार करण्याचा मनाई आदेश पारित करण्यात आला आहे .अशी अधिकृत माहिती प्रेस नोट द्वारे शेंदुर्णी पोलिसांनी दिली आहे.