आपल्या कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या सत्कारामुळे भारावलो जिल्हा सरकारी वकील अँड. सुरेंद्र जी.काबरा

110

शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी
जामनेर वकील संघाचा मी सदस्य आहे. आपल्या तालुक्यातील वकील बांधवांनी मी ज्या न्यायालयात वकिली सुरू केली त्याच न्यायालयाच्या आवारात आपल्या माणसांनी आपल्या माणसाचा सत्कार केला म्हणजे माझ्या परिवारानेच माझा हा सत्कार केला ,असंख्य आठवणी आहे माझ्या या न्यायालयात यामुळे मी भारावलो आहे असे प्रतिपादन जळगांव जिल्ह्याचे नुतन सरकारी वकील अँड. सुरेंद्र जी.काबरा यांनी केले आहे.
शेंदुर्णीचे सुपुत्र, जामनेर वकील संघाचे सदस्य अँड. सुरेंद्र जी.काबरा यांची जळगांव जिल्हा सरकारी वकील म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांच्या पहिला जाहीर सत्कार नुकताच जामनेर न्यायालयाच्या आवारात करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ विधीज्ञ अशोक डोल्हारे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन दिवाणी व फौजदारी न्यायाधीश डी.एन.चामले,सहा.दिवाणी व फौजदारी न्यायाधीश बी.एम.काळे,पी.व्ही.सुर्यवंशी, सरकारी वकील सौ.कृतिका भट,अनिल सारस्वत आदी उपस्थित होते.
जामनेर वकील संघाचे अध्यक्ष अँड. किशोर राजपुत यांनी प्रास्ताविकात या सत्कार सोहळ्याचे महत्त्व विषद केले. सर्व मान्यवरांचे हस्ते जामनेर वकील संघाचे वतीने सरकारी वकील अँड. सुरेंद्र जी.काबरा यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अँड. शिवाजी सोनार, अँड. धर्मराज सुर्यवंशी, अँड. देवेंद्र पारळकर ,न्या.डी.एन.चामले, कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. अशोक डोल्हारे यांनी आपल्या मनोगतात आपल्या परिवारातील सदस्य अँड. सुरेंद्र जी.काबरा आज जळगांव जिल्हाचे सरकारी वकील झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
या प्रसंगी जळगांव येथुन आलेले अँड. श्रीकांत भुसारे,अँड. एस.के.शिरुडे,अँड. प्रविण झंवर तसेच अँड. अरुण एन.पाटील, अँड. व्ही.एस.पाटील, अँड. सितेष साठे,अँड. आर.बी.पाटील, अँड. बी.एन.बाविस्कर, अँड. के.डी.बनकर, अँड. पी.के.सोनार, अँड. पी.एन.देशमुख, अँड. भावना काबरा, अँड. भक्ती काबरा तसेच जामनेर वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन अँड. संजय पाटील तर आभार जामनेर वकील संघाचे सचिव ज्ञानेश्वर राजपुत यांनी मानले.