सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे मँडम यांना सेवा गौरव पुरस्कार जाहीर

218

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) सहाय्यक पोलीस निरिक्षक नीता कायटे यांची सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कोरोना काळात नोडल अधिकारी म्हणून कार्य पाहिले ते फार जोखमीचे होते त्यात त्या कोरोणा पॉझिटिव्ह देखील आल्या होत्या. विविध गुन्ह्यांचा तपास लावला, सामाजिक कार्यात नेहमीच त्या अग्रेसर असतात, महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी एक हक्काचा व्यासपीठ महिलांसाठी बनले, बऱ्याच घटस्फोटीत महिलांचे त्यांनी समजूती मधून प्रश्न मार्गी लावले आहेत,एक लेडीज सिंघम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, पोलीस आणि नागरिक यांची भीती दूर निर्माण केली, पथनाट्याच्या माध्यमातून दिवाळी किंवा इतर सणांमध्ये चोऱ्या कशा थांबतील यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण केली.त्यांच्या कार्याची दखल घेऊन
हा पुरस्कार संस्थेच्या साहावा वर्धापनदिन व कु.लक्ष्मी पंडित हिच्या आठव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटि औरंगाबाद मार्फत दिला जाणार आहे.औरंगाबाद येथे मोठ्या थाटात सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा व भव्य रक्तदान शिबिरे आयोजन दिनांक ३०/१२/२०२२ रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.असे पत्राद्वारे नीवड समिती तर्फे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे.