लोहारा गावातील तिघांच्या कार्याची मराठवाड्यातील सु-लक्ष्मी बहुउद्देशी संस्था व माणुसकी समूहाने घेतली दखल

278

 

दिनेश चौधरी, लोहारा प्रतिनिधी – लोहारा गाव म्हणजे रत्नांची खाण… येथे अनेक कलावंत,पत्रकार,कवी,लेखक.डॉक्टर. सिनेकलावंत,असे कितीतरी मान्यवर या जन्मभूमीत जन्माला आलेत. आणि याच चांगल्या कार्याची दखल मराठवाड्यातील अत्यन्त नावलौकिक असणाऱ्या सु-लक्ष्मी बहुउद्देशी संस्था व माणुसकी ग्रुप समूहाने दखल घेतली आहे.औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह रुग्णालय घाटी यांनी खानदेशातील जळगाव जिल्हात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या तिघांच्या कामाची दखल घेऊन पुरस्कार जाहीर केला आहे. सदर पुरस्कार हा सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी समूह यांच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने 30 डिसेंबर 2022 शुक्रवार रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत व हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

लोहारा गावातील तिघांच्या कार्याची मराठवाड्यातील सु-लक्ष्मी बहुउद्देशी संस्था व माणुसकी समूहाने घेतली दखल,

या पुरस्कारा मध्ये लोहारा ता. पाचोरा येथील ज्येष्ठ नागरिक व कवी.मंगलदास मोरे यांना कला क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कला क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला असून त्यांचा कवितासंग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे.त्यांनी आतापर्यंत जवळपास 2300 कविता लीहल्या आहेत. त्यानंतर लोहारा येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक वामन पवार यांना सामाजिक क्षेत्रात विधायक काम केल्याबाबत सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.तसेच रॅपिड ॲक्शन फोर्स (CRPF) मध्ये मुंबई येथे सेवा देत असलेले लोहारा येथील जवान चंद्रकांत वसंत गीते यांना सुद्धा सामाजिक क्षेत्रात विधायक काम केल्याबद्दल सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ते ड्युटीवर असताना देश सेवा तर करतातच परंतु सुट्टीवर आल्यावर सुद्धा समाजाची आपल्या हातून सेवा व्हावी या निस्वार्थ उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम घेऊन समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य करीत आहेत. मराठवाड्यातील सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूहाने वेगवेगळे क्षेत्रात काम करणाऱ्या लोहारा गावातील म्हणजे ग्रामीण भागातील 3 व्यक्तींची सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे व माणुसकी रुग्णसेवा समूहाचे अध्यक्ष सुमित पंडित व निवड समिती यांनी निवड केल्याने लोहारा शहर पत्रकार मंच व विविध स्तरातून पुरस्कारार्थींचे निवड केल्याने कौतुक होत आहे.