डॉ. पंडित विद्यालयाचे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत विद्यार्थ्यांचे सुयश

275

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी )  डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाने दि. 12- 12- 2022 ( सोमवार) रोजी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत जिल्हा क्रिडा संकूल जळगांव येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत, विद्यालयातील 14 वर्षे वयोगटाआतील विद्यार्थिनी कु.संध्या गोपाल कोळी हिने जिल्हास्तरावर लांब उडी, प्रथम क्रमांक 100 मी धावणे, प्रथम क्रमांक 200 मी धावणे, प्रथम क्रमांक मिळवला विशेष या म्हणजे*एकाच मुलीने तीनही गटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिची निवड विभागीय स्तरावर या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. विजयी स्पर्धकांचे कौतुक संस्थेचे चेअरमन आदरणीय संजय दादा गरुड, संस्थेचे सचिव आदरणीय सतीश चंद्रजी काशीद, संस्थेच्या महिला संचालिका आदरणीय सौ. उज्वला ताई काशीद, सहसचिव आदरणीय दिपक भाऊ गरुड, वस्तीगृह सचिव आदरणीय कैलास भाऊ देशमुख, विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती प्रमुख आबासाहेब भि. शा. शेळके, विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक अ. अ. पटेलसर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर एस परदेशी ,पर्यवेक्षिका सौ. यु. डी. शेळके , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनी व विजयी स्पर्धकांच्या पालकांनी केले आहे. या मैदानी स्पर्धेतील विजयी खेळाडूंना विद्यालयातील क्रीडा शिक्षक आर. जी. बैरागी, एस एस गुजर, के. एम. पाटील, पी. एम .पाटील या शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.