शेंदुर्णी येथे संत शिरोमणी श्री. नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न

152

 

शेंदुर्णी ( ता . जामनेर )  दि. 8, बुधवार रोजी संत शिरोमणी श्री. नरहरी सोनार यांची 737 वी पुण्यतिथी सोहळा शेंदुर्णी अहिर सुवर्णकार समाज मंडळ आणि अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला.
यावर्षी प्रथमच सोहळयाची सुरुवात, गेल्या 13 वर्षापासून शेंदुर्णी येथे सुरु सकाळी सुरु असलेल्या प्रभात फेरी मध्ये सहभागी होऊन करण्यात आली. त्यासाठी समस्त सुवर्णकार बांधव-भगिनी श्री. त्रिविक्रम मंदिर येथे पहाटे 5 : 30 वा. एकत्रित येऊन टाळ मृदंगासह विठ्ठल नामाचा गजर करीत प्रभात फेरी काढली गेली. त्याप्रसंगी संजय विसपुते यांनी समाज मंडळासह किमान आठवडयातून एकदा प्रभात फेरीमध्ये सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला.

त्यानंतर स. 8 वा. संत श्री. नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे दत्तात्रय सोनार यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आहे. प्रसंगी समस्त सुवर्णकार बंधू- भगिनींच्या हस्ते आरती सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रम स्थळी उपस्थित भगवान अहिराव , नयना वडनेर , पुजा विसपुते , तसेच समाज बंधू-भगिनींनी भजन म्हणित संत श्री नरहरी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले. तसेच रविंद्र बाविस्कर यांच्या हस्ते सपत्नीक श्री. सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली.यावेळी सुवर्णकार समाज मंदिर उभारणीसाठी देणगी देणारे योगेश लुणिया, श्रीपाद विसपुते व आकाश विसपुते यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर रात्री 8 वा. ह.भ.प. श्री. कन्हैया महाराज ( शेंदुर्णीकर ) यांचे श्री. त्रिविकम महाराज मंदिर येथे सुश्राव्य किर्तन झाले. विष्णू दुसाने यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला तर भजनी मंडळांचा सत्कार योगेश वडनेरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंडळाचे कार्यध्यक्ष संजय विसपुते यांनी केले तर आभार मंडळांचे खजिनदार राजेंद्र विसपुते यांनी मानले. कार्यक्रमाला समाज अध्यक्ष श्रीपाद विसपुते , समस्त सुवर्णकार बंधु भगीनी म ,भाविक भक्त मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.