सा. बा. विभाग अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर व गोविंद भाई अग्रवाल यांच्या मध्यस्थीनंतर रस्ता रोको शिवजयंती पर्यंत स्थगित.

453

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी येथील सोयगाव रोडवरील स्टेट बँक ते मोहम्म्दिया हायस्कूल पर्यंतचा दोन किलोमीटर रस्ता पाच वर्षातही सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर पूर्ण करू शकला नाही .त्याबद्दल आठ फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी दहा वाजता होणारे रस्ता रोको आंदोलन शिवजयंती पर्यंत वीस तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेंदुर्णी येथील सोयगाव रोड वरील दोन किलोमीटर चा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जाणीवपूर्वक गेल्या पाच वर्षापासून सुरू करूनही पूर्ण करीत नाही .त्याचा रहिवाशांना ,शाळकरी विद्यार्थ्यांना, भाविक भक्तांना व वाहतूकदारांना खूपच त्रास होतो .या सर्वांनी एकत्रित येत 8 फेब्रुवारी बुधवारी सकाळी दहा वाजता रस्ता रोको आंदोलनाचा लेखी इशारा संबंधितांना दिला होता. त्या दृष्टीने नियोजन पूर्ण झालेले होते. मात्र शेंदुर्णी आऊट पोस्टला झालेल्या बैठकीत पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, पोलीस अधिकारी शशिकांत पाटील व बांधकाम विभागाचे संबंधित शासकीय कर्मचारी त्यांचे सोबत त्रस्त वाहतूकदार रहिवासी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकाऱ्यांचे लेखी पत्र असे होते की ‘काम लागलीच सुरुवात करू’ त्या नंतर गोविंद भाई अग्रवाल ही सुद्धा जिल्हास्तरावरील बांधकाम विभागांच्या अधिकाऱ्यांची बोलले. त्यानुसार बैठकीत ठरल्यानुसार लवकरच कामाला सुरुवात न झाल्यास शिवजयंती नंतर 22 फेब्रुवारी बुधवार रोजी रस्ता रोको करण्यात येईल. अशी माहिती सोयगाव रोडवरील त्रस्त रहिवासी वाहतूकदार यांनी एका पत्रकांमुळे कळवली आहे.