देशाच्या विकासात महिलांचा सिंहाचा वाटा – राष्ट्रवादीचे नेते संजयदादा गरुड

203

गरुड महाविद्यालयात शरद पवारांच्या वाढदिवसाला महिला शिक्षकांचा सत्कार …                                                                                                          शेंदुर्णी तालुका जामनेर-  सकाळी उठल्यापासून सामाजिक आर्थिक कौटुंबिक गरजा व संस्कृती परंपरा जोपासत महिलेचे कार्य सुरू होते त्या कार्याला वेळेची कधीही मर्यादा नसते. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष केंद्रीय माजी संरक्षण व कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांना महिलाच्या कार्याची जाण आहे. महिलांचा सदैव मान राखत सर्व क्षेत्रात पारदर्शक व्यवहार ,आर्थिक सुदृढ सक्षम होण्यासाठी महिलांना आरक्षण 33% यावरून 50 टक्क्यांपर्यंत काम पवार साहेबांनी केले, समाजातील दीनदुबळ्या साधारण व सक्षम सर्व आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची शिदोरी वाटप करणाऱ्या महिला शिक्षकांचा सामाजिक शैक्षणिक विकासात देखील सिंहाचा वाटा अशा महिलांचा सत्कार होणे गरजेचे आहे,  त्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकसभेच्या संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना विचार आला. राज्यातील महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गुणगौरव करावा असा विचार आला राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद चंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 12 डिसेंबर पासून वेगवेगळ्या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम सुरू आहे, असे अध्यक्ष मनोगत संजयदादा गरुड यांनी गरुड महाविद्यालयात व्यक्त केले,
सविस्तर वृत्त असे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रीय माजी संरक्षण व कृषिमंत्री शरद चंद्र पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने महिला शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन लिमिटेड चेअरमन राष्ट्रवादीचे नेते संजयदादा गरुड होते, यावेळी प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव सतीश काशीद,  संचालिका उज्वलाताई काशीद, जि प सदस्या सौ सरोजनी ताई गरुड , खरेदी विक्री जिंनिग चे संचालक अशोक चौधरी, राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौ वृषाली गुजर, मोहसिना खाटीक,  चंद्रकलाबाई धनगर, भावना जैन, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्रीराम काटे , दीपक जाधव गरुड शाळेचे मुख्याध्यापक एसपी उदार उपमुख्याध्यापक एस पी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कारार्थी महिला प्रतिनिधी सौदामिनी गरुड छाया पाटील सचिव सतीशजी काशीद आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस वंदनाताई चौधरी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आयोजनाचे महत्व सागितले, आभार कुमिदीनी गरुड यानी मानले.