भाजपा पाचोरा तर्फे महावितरण विरुद्ध टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन

248

 

पाचोरा प्रतिनिधी –  येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात महावितरणाने वीज पुरवठा खंडित करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी आज दि.०५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता महावितरण कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.राज्यातील ७२ लाख वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा जुलमी निर्णय ठाकरे सरकारने त्वरित मागे घेण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर व ग्रामीणच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून भाजपा पाचोरा च्या वतीने याआदी देखील लॉकडाऊन काळातील वीज बिलांत सवलत मिळावी यासाठी संपूर्ण शहरातील चौकाचौकात फलक लावून स्वाक्षरी मोहीम देखील राबवली गेली होती व शहरातील नागरिकांच्या फलकावर सह्या घेऊन नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडुन अशा अनोख्या पद्धतीने आंदोलन केले गेले होते.
कोरोना काळांत जनतेला वीज बिलांत सवलत देण्याचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीजबिल वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहे. थकीत वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र आम्ही ठाकरे सरकारला मनमानी कारभार करू देणार नाहीत.भाजपाचे कार्यकर्ते महावितरणा विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करतील तसेच वीज पुरवठा खंडित करण्यास येणाऱ्या महावितरणाच्या कर्मचार्‍याला अटकावही करतील.