शेंदुर्णी उत्तर भाग विकास कार्यकारी सोसायटी व दक्षिण भाग विकास कार्यकारी सोसायटीची निवडणुक अखेर तांत्रिक प्रक्रियापूर्ण करुन बिनविरोध

225

शेंदूर्णी प्रतिनिधी – येथील शेंदुर्णी उत्तरभाग विकास कार्यकारी सोसायटी व दक्षिणभाग विकास कार्यकारी सोसायटीची निवडणुक अखेर तांत्रिक प्रक्रियापूर्ण करून बिनविरोध करण्यात आली. शेंदूर्णी येथील वरील दोन्ही विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन नामांकन अर्ज दाखल झाले होते नामांकन माघारीचे दिवशी वेळेत उमेदवारांना आपल्या माघारी देता आल्या नाहीत परंतु निवडणूक बिनविरोध करण्यावर पॅनल प्रमुख व नेते यांच्यात एकमत झालेले होते.म्हणून आज तांत्रिक निवडणुक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.व निकाल घोषित करण्यात आला त्यानुसार दक्षिण भाग विकास कार्यकारी सोसायटी मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी उमेदवार विजयी झाले ते पुढीलप्रमाणे सर्वसाधारण १) बारी भिका रामकृष्ण २) बारी लक्ष्मण सुरेश ३)गुजर प्रवीण देविदास ४)गरुड विठ्ठल बबनराव ५)काबरा विजय शालिग्राम ६)नाथ धनराज रतन ७)पाटील कैलास रघुनाथ ८)शेख लुकमान शेख ताज मोहम्मद महिला राखीव१) धनगर इंदुबाई गरबड२) गरुड अलकाबाई जयपाल भटक्या विमुक्त जाती १)धनगर अशोक पंढरी इतर मागासवर्ग१) चौधरी विजय रघुनाथ अनुसूचित जाती जमाती १)चांभार सावजी
तसेच उत्तर भाग विकास कार्यकारी सोसायटी मध्ये भाजपचे पॅनल विजयी झाले ते पुढील प्रमाणे सर्वसाधारण मतदारसंघ १)अग्रवाल नितीन गोविंद२) बारी अर्जुन धना३) बारी संजय किसन ४)चौधरी सुभाष विठोबा ५)गुजर कालिदास अंबादास ६)इंगळे किसन भिका७) पाटील तुकाराम कडोबा८) सूर्यवंशी कडोबा सोनजी महिला राखीव १) बारी काजल मनोज२) गुजर सविता राजेंद्र इतर मागासवर्ग १) माळी कडोबा सुखदेव विमुक्त जाती भटक्या जमाती १) कोष्टी दिनकर कृष्णा अनुसूचित जाती जमाती १) निकम देविदास छगन
दोन्ही सोसायटी निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहकार अधिकारी डी व्ही पाटील , एस एस पवार सहाय्यक निबंधक कार्यालय जामनेर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले त्यांच्यासोबत गजानन निकम,अनिल पाटील भानुदास पाटील, दत्तु काळे, संपत पाटील ,प्रभाकर कापसे, निवृत्ती पाटील उत्तर भाग सोसायटीचे सचिव राजेंद्र खर्चाने , दक्षिण भाग संस्था सचिव संजय चौधरी, संस्था कर्मचारी संजय चौधरी, विनोदी इंगळे अशोक चौधरी विकास गुजर,एकनाथ गुजर यांनी सहकार्य केले
निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरूड,सुधाकर बारी,सागरमल जैन,डॉ.किरण सूर्यवंशी,शांताराम गुजर,राजेन्द्र पवार,राजेंद्र राजपूत,आनंदा धनगर,विलास अहिरे शिवसेनेचे संजय सूर्यवंशी, बारकू जाधव,सुनील अग्रवाल, युवराज बारी ,कैलास काबरा तर भारतीय जनता पक्षाचे नेते गोविंद अग्रवाल, अमृत खलसे,नारायण गुजर, राजेंद्र भारुडे,विजय गुजर,निलेश थोरात,श्रीकांत काबरा,गणेश पाटील,सुनिल शिनकर यांनी प्रयत्न केले.
दक्षिण भाग , उत्तरभाग विकास सोसायटी निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरूड यांनी अभिनंदन केले आहे तसेच सहकार विभागाचे निवडणूक अधिकारी डी.व्ही.पाटील व एस. एस.पवार सर्व निवडणूक कर्मचारी तसेच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व निवडुन कमी नियुक्त पोलीस कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.