रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडावर दुचाकी आदळली;एक गंभीर,-सोयगाव जवळील घटना

167

सोयगाव तालुका प्रतिनिधी, दत्तात्रय काटोले – सोयगाव, ता.२७…सोयगाव शहरा जवळ च वादळी वाऱ्यात आडव्या झालेल्या रस्त्यावरील झाडावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात सोयगाव तहसील चा शिपाई गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री दहा वाजता घडली आहे गुरुवारी अद्यापही सार्वजनिक विभागाने सदरील आडवे पडलेल्या झाडाला रस्त्यावरून हलविले नाही त्यामुळे शहर वासीयांमध्ये संताप निर्माण झाला आहे

सोयगाव शहरात बुधवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्याचा तडाख्यात सोयगाव शहर जवळ झाड उन्मळून पडले होते दरम्यान बुधवरी रात्री महसूल मंत्र्यांचा कार्यक्रम आटोपून घराकडे जात असलेला सोयगाव तहसील च्या शिपाई गोविंदा शामराव गोफने(वय ४०) यांची दुचाकी अंधारात झाड न दिसल्या मुळे झाडावर आदळून अपघात झाला या अपघातात गोविंदा गोफने गंभीर जखमी झाले असून घटनास्थळी तहसील चे कर्मचारी संतोष नवगिरे अनिल पावर यांनी तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ,सोयगाव शहरात झालेल्या वादळी वाऱ्यात सीयगाव जवळ रस्त्यावर झाड पूर्णपणे उन्मळून पडले होते दरम्यान बुधवारी महसूल मंत्री यांचा कार्यक्रम असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे डझनभर अधिकारी सोयगावात हजर होते परंतु मंत्री या रस्त्यावर जात नसल्याने या अधिकारी यांच्या पथकाने या झाडाकडे दुर्लक्ष केल्या मुळे गुरुवारी रात्री पर्यंत हे झाड रस्त्यावर च आडवे होते त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे.