राहुल सपकाळे प्रतिनिधी –
शेंदुर्णी येथे दिनांक: ७/२/२०२५ वार-शुक्रवार रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांची १२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माता रमाई जयंती चे अध्यक्ष समाधान भाऊराव निकम, उपाध्यक्ष संजय भीमराव निकम, खजिनदार सागर भगवान निकम यांची निवड करण्यात आली माता रमाई जयंती ची सुरुवात गौतम नगर वाडी दरवाजा येथून झाली.
माता रमाई जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून राजूभाऊ खरे ( बहुजन मुक्ती पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष ),अमोल सुरवाडे (सामाजिक कार्यकर्ते ), गोविंद शेठ अग्रवाल (भा.ज.पा ज्येष्ठ नेते), ॲड.रंजीत तडवी,निलेश हीवाळे (भारत मुक्ती मोर्चा जामनेर तालुका अध्यक्ष),अजय निकम (सामाजिक कार्यकर्ते),शरद बारी (माजी नगरसेवक) पप्पू गायकवाड (माजी नगरसेवक), तुषार भाऊ भारुडे (समाजसेवक) उपस्थित होते. उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार रमाई जयंती चे आयोजक गौतम नगर मित्र मंडळ यांच्यामार्फत करण्यात आला.
माता रमाई जयंती आपण का साजरी करतो त्यासाठी प्रबोधनाचा कार्यक्रम लावण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना अमोल सुरवाडे यांनी केली. गोविंद शेठ अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण राजूभाऊ खरे (बहुजन मुक्ती पार्टी जळगाव जिल्हा अध्यक्ष) यांनी केले.
जयंती यशस्वी करण्यासाठी उत्तम घोडसवार,विजय सपकाळे,प्रमोद घोडेसवार,विशाल वाघ,रवी निकम,अर्जुन निकम,संदीप निकम,भारत निकम,आकाश निकम,गौतम घोडेस्वार,अजय निकम,संतोष सुरवाडे,रोशन शिरसाट,अतुल सपकाळे,राजू निकम,गोविंदा घोडेस्वार,किरण नन्नवरे,विनोद घोडेस्वार,प्रवीण इंगळे,सुरेश घोडेस्वार,अक्षय घोडस्वार,संजय निकम,भैय्या घोडस्वार,विजय निकम यांनी मेहनत घेतली. पोलीस बंदोबस्त साठी पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पोलीस बंदोबस्तासाठी शेंदुर्णी दूरक्षेत्र पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र हाडपे, होमगार्ड मनोज गुजर हे उपस्थित होते.
जयंतीचा मार्ग- गौतम नगर वाडी दरवाजा,नुरानी मस्जित,गांधी चौक, नागसेन नगर, पारस चौक, महावीर मार्ग, पहूर दरवाजा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, सोनार गल्ली, तसेच गौतम नगर येथे समारोप करण्यात आला.