अजय निकम शेंदुर्णी – शेंदुर्णी नगरपंचायत तसेच तलाठी कार्यालय शेंदुर्णी हे गावातील मुख्य शासकीय कार्यालय असल्याकारणाने गावातील महिला पुरुष यांना रोज शासकीय दस्तऐवज ,कामासाठी यांच्या कार्यालयात यावे लागते येथे मात्र स्वच्छतेचा अभाव दिसत आहे शौचालय नसल्याकारणाने लघुशंके साठी ज्येष्ठ वृद्ध ,महिला,नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे, त्याबरोबर नगरपंचायतीमध्ये महिलावर्ग कर्मचारी यांची देखील खूप मोठी संख्या असल्याने त्यांना देखील या त्रासाचा सामना करावा लागत आहे, गावातील सुज्ञ नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांचे मागणी आहे की शेंदुर्णी नगरपंचायत लाखो रुपयांचे, कोटी रुपयाचे विकास कामे करत आहे त्यात माझी वसुंधरा अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक, मिळवलेले असून त्या अंतर्गत त्यांना अनुदान देखील देण्यात येते ते नुसते कागदावरच आहे का ? छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देता येत नाही का ? प्रत्येक वेळेस त्यांना कुंभकर्णाच्या झोपेतून जागे करावे लागते , म्हणजे आंदोलन करणे वैगरे तसेच नागरिकांनी वृत्तपत्रांमध्ये बातम्या दिल्याशिवाय ते काम करणार नाहीत का ? असे कार्यालयात येणारे नागरिक बोलत आहे, मुख्याधिकारी प्रशासक म्हणून विवेक धांडे साहेब याची दखल घेतील का नगरपंचायत महिला कर्मचारी तसेच कामासाठी येणाऱ्या महिला पुरुष नागरिकांना त्या सुविधांचा वापर करून घेता येईल का ? असा प्रश्न गावातील सामान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ते करीत असून शेंदुर्णी नगरपंचायत येथे महिलांचे शौचालय बांधकाम करा अशी सुज्ञ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे .