स्वच्छतेचा दोन वेळा पुरस्कार मिळालेल्या शेंदुर्णी नगरपंचायती मध्येच घाणीचे साम्राज्य , सामाजिक कार्यकर्ते फारुक खाटीक यांची जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे कारवाहीची मागणी

11

        प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर –

शेंदुर्णी नगर पंचायत येथे नगरपंचायती मध्येच घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे शेंदुर्णी नगर पंचायतला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत स्वच्छतेचा महाराष्ट्र राज्यात क्रमांक दोन चा पुरस्कार दोन वेळेस मिळालेला आहे पण ते फक्त कागदावरच राहिलेलेले दिसत आहे शेंदुर्णी नगर पंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विवेक धांडे साहेब येथे रुजू झाले तेव्हा पासून नगर पंचायत मध्ये पूर्ण मनमानी कारभार सुरु आहे अशा अनेक तक्रारी आहेत  समस्या आहेत याकडे जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांनी लक्ष देऊन शेंदुर्णी नगर पंचायतचे मुख्याधिकारी विवेक धांडे साहेब यांच्यावर कारवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फारुक खाटीक यानी केली आहे .
नाव मोठे लक्षण खोटे असलेला प्रकार शेंदुर्णी नगरपंचायत येथे अनुभवास येत आहे ,आपण फोटोत बघू शकतात शेंदुर्णी नगरपंचायत च्या प्रवेशद्वाराजवळच नागरिकांसाठी तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बैठक आसनाजवळ भिंतीवर गुटखा खाऊन थुकुन थुकुन घाण केलेली दिसत आहे मुतारी चा वास येतो कार्यालयीन आवारात ठिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य असून बाहेरच्या लोकांना त्याचा त्रास होतो मुख्याधिकारी विवेक धांडे साहेब ए सी ऑफिस मध्ये बसत असल्याने त्यांना बाहेरची हवा कळत नाही  , लोकास सांगे ब्रह्मज्ञान आपले कोरडे पाषाण अशी गोष्ट अनुभवास येत आहे. स्वतः नगरपंचायतीच्या कार्यालयात इतके घाण्याचे साम्राज्य असेल तर गावात किती घाण असेल ? याचा आपण विचार न  केलेलाच बरा गावात आरोग्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत नाले सफाई , केरकचरा , गटार सफाई स्वच्छता याच्या नियोजनात नगरपंचायतीचे मुख्याधिकारी , आरोग्य विभागाचे प्रमुख सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे , आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून दिवसभरातून आठ तासाची ड्युटी काम करून देखील रात्री उशिरापर्यंत काम घेऊन गावसफाईचे कारनामे फक्त देखाव्या पुरतीच सुरु आहे  सुज्ञ नागरिकांचे यावर प्रतिक्रिया घेतली असता नगर पंचायत च्या मनमानी कारभारा विषयी खूप मोठा राग रोष दिसत आहे. नको ते सगळे कर टॅक्स नगरपंचायत इकडून वसूल केले जात असून नागरिकांना सुविधा देण्यास मात्र नगरपंचायतीला सपशेल अपयश आले असल्याचे बोलले जात आहे .

जिल्हाधिकारी साहेब यांनी नगर पंचायतच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करून कारवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फारुक खाटीक यानी केली आहे .

छायाचित्रकार  – अजय निकम