जिया काजी शेंदुर्णी – मोकाट कुत्रे यांची गैंग शेंदुर्णी शहरात फिरत असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे परंतु नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे येथील मोकाट कुत्रे इतके खूंखार झाले आहे की ते मानसावर अचानक हल्ला करून फाडून त्याचा खून करू शकतात सोयगाव रोड तसेच शहरात मोकाट कुत्रे यांची संख्या वाढली आहे .
शेंदुर्णी येथील मुस्कान जनरल स्टोअर दुकाना समोर शादाब जहागिर शेख या बालकाला मोकाट कुत्रा याने चावा घेतल्याने बालक जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्यात आले या घटनेने बालका मधे घबराहट निर्माण झाली असून शेंदुर्णी नगर पंचायत ने मोकाट कुत्रे यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे .