शेंदुर्णी नगर पंचायतचे आरोग्य व सफाई कर्मचारी विविध मागण्या मंजूरीसाठी संपावर , मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या कडे निवेदन सादर

13

प्रतिनिधी शेंदुर्णी ता.जामनेर – 
शेंदुर्णी नगर पंचायत यांनी साई इंटरप्राईजेस कंपनी नांदेड यांना घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका देण्यात आलेला आहे,त्या ठेक्यातील आरोग्य सफाई कर्मचारी हे आपल्या विविध मागण्या संदर्भात संप पुकारत आहे. याबाबत शेंदुर्णी नगर पंचायतचे  मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना दिनांक २३/१२/२०२४ रोजी निवेदन देण्यात आले .

शेंदुर्णी नगरपंचायत यांच्यामार्फत साई इंटरप्राईजेस नांदेड यांना घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका देण्यात आलेला आहे सदर ठेकेदार येथील कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार पगार देत नसून (८/१० तास ड्युटी केल्यावर केवळ १०००/दहा हजार रुपये प्रति महिना या प्रमाणे मानधन /पगार देत आहे, तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त वेळ काम करून आमचं शोषण करत आहे ,सदर ठेकेदाराचे मुकदम सुपरवायझर हे आरोग्य विभागातील मागासवर्गीय दलित ,साफसफाई कर्मचारी यांना उर्मट व उद्धट शिवराळ भाषा वापरून शासनाने आखून दिलेल्या नियमा पेक्षा अधिक वेळ काम करून घेत आहेत. किमान आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुट्टी मिळत नाही ,आम्हाला सुरक्षा साधन देखील सदर ठेकेदाराकडून उपलब्ध करून देण्यात येते नाही, आमच्या भविष्य उदरनिर्वाह epf निधीची माहिती देखील आम्हाला देण्यात येत नाही,

सफाई कर्मचाऱ्यांची विविध मागणे खालील प्रमाणे…

१) शेंदुर्णी नगर पंचायत येथील साई इंटरप्राईजेस कंपनी नांदेड यांनी आम्हाला किमान वेतन आयोगानुसार पगार द्यावा ,२)शासन निर्णयानुसार आम्हा आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांना वेळेची मर्यादा द्यावी ,
३) आमच्या भविष्य उदरनिर्वाह निधी (epf) याची माहिती द्यावी.
४) सदर ठेकेदाराने नियुक्त केलेल्या मुकरदम यांच्या जागी नवीन मुकदम सुपरवायझर यांची नेमणूक करण्यात यावी..
५) किमान आठवड्यातील एक दिवस साप्ताहिक सुट्टी आम्हाला मिळावी.
अशा प्रकारे आमच्या मागण्या असून या सर्व बाबींचा विचार करून त्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा यापुढे आम्ही कायदेशीर संविधानिक मार्गाने न्यायासाठी यापेक्षा मोठ्या आंदोलन पुकारू असा इशारा देखील देण्यात आला आहे .
निवेदनावर शेंदुर्णी नगर पंचायतचे आरोग्य व सफाई कर्मचारी यानी सह्या केल्या असून सर्व मागासवर्गीय दलित आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी आहेत .
अखिल भारतीय सफाई कामगार संघटन प्रदेश सचिव संतोष भाऊ थामेथ यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी येथे अजय भाऊ निकम , शहराध्यक्ष सफाई कामगार संघटना किशोरजी जावळे सोलंकी , तुषार भाऊ भारुडे तसेच आरोग्यवस्थेतील सर्व महिला व पुरुष सफाई कामगार तसेच संतोष भाऊ महाले, चौधरी राहुल भाऊ सपकाळे , फारुख भाऊ खाटीक ,इम्रान शेख यांच्या उपस्थितीत मा. मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना निवेदन देण्यात आले .