महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमा अंतर्गत सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया आणि विवा कॉलेज विरार यांच्या सहकार्याने 55555 तरुणांना सोलर एनर्जी अवेअरनेस प्रोग्राम 2025 हे प्रशिक्षण राज्यभरातील विद्यार्थ्यांना देण्यात आले. या अवेरनेस प्रोग्राम नंतर एक परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या अवेअरनेस प्रोग्राम मध्ये गरुड महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असता, गरुड महाविद्यालयाची द्वितीय वर्ष वाणिज्यची विद्यार्थिनी कु. जयश्री अमृत भारुडे ही जळगाव जिल्ह्यातून प्रथम आली. या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर १००% सोलर एनर्जी अवेअरनेस कॅम्पस म्हणून गरुड महाविद्यालयाला प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारणासाठी करिअर कट्ट्याच्या महाविद्यालयीन समन्वयक प्रा.डॉ.योगिता चौधरी यांनी विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहभागाचे विविध व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमाची प्रसिद्धी दिली .त्यामुळे कार्यक्रमाची माहिती ही समाजातील विविध घटकापर्यंत पोहोचली.करिअर कट्टा मार्फत आयोजित विविध उपक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी उत्साहाने सहभागी होत असतात.त्यातीलच हा उत्स्फूर्त असा सहभाग होता. सदर विद्यार्थिनी आणि महाविद्यालयाच्या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब संजयरावजी गरुड, संस्थेचे सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब यु.यु.पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकराव गरुड, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ .संजय भोळे, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.