शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी येथे खा. अमोल कोल्हे व राष्ट्रवादी शरद चंद्र पवार चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा शेंदुर्णी धावती भेट झाली. यावेळी त्यांचे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त जामनेर येथे जात असलेले
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांचे सत्कार डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सागर गरुड यांनी केले तर खासदार श्री अमोल कोल्हे साहेब यांचे सत्कार शिवसेना शहर प्रमुख भैयाभाऊ गुजर यांनी केले.
माजी मंत्री गुलाबराव देवकर, यांचे स्वागत काँग्रेस चे नेते अमरीश गरुड व राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्री राम काटे यांनी केले .
महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करताना शिवसेना शेतकरी नेते सुनील अग्रवाल,भैय्या सुर्वे, संदीप बारी, युवराज बारी(जय हरी भाऊ), कैलास काबरा, विलास बारी, अशोक बारी, राजेंद्र पाटील, भूषण बडगुजर, सुनील बिराड, संतोष माळी, सागर पाटील, विलास पाटील ,रुद्र गुजर ,दर्शन गुजर ,श्रीराम काटे ,सचिन धनगर ,प्रदीप पाटील ,सोपान चौधरी, मेहबूब सेठ , इसाक बागवान , नूर मोहम्मद शेख , अश्फाक बागवान , फैजान मोहसीन ,लियाकत अली, गफ्फर खान ,इस्माईल शेख ,शफी मणियार आदी कार्यकर्ते व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.