गणेशोत्सव काळात निर्माल्य संकलनाचे कार्य करतोय शेंदुर्णीत युवा गुरव समाज

8

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी
गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने भव्य गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे.दररोज गणपती बाप्पा ची पुजा करण्यात येते यानिमित्ताने भले मोठे हार, फुले वाहिली जाते या वाहिलेल्या हजारांचे फुलांचे निर्माल्याचे यथोचित संकलन करून व्यवस्थापन करुन अभिनव उपक्रम येथील युवा गुरव समाजाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे.
या युवा गुरव समाजाच्या वतीने शहरातील सर्व गणेश मंडळांना भेटी देऊन मोठी पिशवी देऊन या पिशवीत निर्माल्याचे संकलनाचे आवाहन केले होते.एका ठिकाणी मोठा खड्डा खोदण्यात आला असुन या ठिकाणी योग्य पध्दतीने हे निर्माल्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.पायदळी न जाता, केराच्या टोपलीत किंवा नदी मध्ये न टाकता योग्य पद्धतीने निर्माल्य संकलन करून युवा गुरव समाजाने आदर्श उपक्रम हाती घेतला आहे.
तरी शहरातील सर्व गणेशभक्तांना गणेश मंडळांना युवा गुरव समाजाचे अध्यक्ष कन्हैया गुरव, उपाध्यक्ष नितीन शेटे सचिव जितेंद्र तायडे व समस्त गुरव समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की आपल्या गणपती बाप्पा घ्या मुर्ती वरच्या हजारांचे फुलांचे निर्माल्य संकलीत करुन आमच्या कडे द्यावे जेणेकरून करुन त्यांचे योग्य व्यवस्थापन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होईल.