अंबाडी धरण येथे गावठी हातभट्टीचा कारखाना सुरू असल्याची माहिती पहुर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक सचिन सानप साहेब यांना मिळताच पहुर पोलिसांन कडून अंबाडी धरणातील गावठी हातभट्टीचा कारखाना उध्वस्त करून कारवाही करण्यात आली सदर कारवाहीत चिलगाव शिवारात अंबाडी धरणाजवळ इसम नामे कबीर शेखलाल तडवी याचे मालकीचे 200 लिटर चे 12 ड्रम , गावठी दारू बनविण्याचे 2400 लिटर कच्चे रसायन किंमत अंदाजे 1,20,000/- जागीच नाश केले. विधानसभा निवडणुकीचे आचारसंहितेचे अनुषंगाने पहूर पोलिसांकडून अवैध दारू निर्मिती करणाऱ्या इसमांवर ठोस कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक सचिन सानप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते, पोलीस हेड कॉन्स्टेबल उदल चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल नरेश घाडगे, संदीप पाटील, चालक मोरे सह होमगार्ड मनोज गुजर इत्यादींनी कारवाही केली आहे , सदर कारवाईने परिसरातील नागरिकांचे समाधान झाले असून, गावठी हातभट्टीचा धंदा करणार घाबरले आहे .