शेंदुर्णी येथे आमदार मा.श्री. रोहित दादा पवार यांची जाहीर सभा

34

प्रतिनिधी जामनेर –   जामनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व महाविकास आघाडी तसेच दिलीप खोडपे सरांच्या विचारधारेवर विश्वास ठेवत स्वाभिमानाने तसेच प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बंधू-भगिनींना कळविण्यात येते की मंगळवार,दि. ५/११/२०२४ रोजी संध्याकाळी – ६.३० वाजता नगरपंचायत समोर, शेंदुर्णी येथे जाहीर सभेला पाठबळ देण्यासाठी हजर राहायचे आहे, ही नम्र विनंती .

खोडपे सरांच्या पक्ष प्रवेशापासून आपण जिल्हा परिषद गटाचे कार्यकर्ते मेळावे, गाव भेट दौरे घेतले त्यात सर्वच पदाधिकारी, जेष्ठ मार्गदर्शक व प्रत्येक गटातील निस्वार्थी कार्यकर्त्यांनी पाठबळ दिले व मिळावे यशस्वी ठरवले. परंतु इथून पुढे होणाऱ्या सर्व सभा ह्या तालुक्यासाठी राहणार आहेत तरी सर्व कार्यकर्त्यांनी जातीने लक्ष घालून प्रामाणिकपणे पक्षासाठी व आपल्या जामनेरच्या परिवर्तनासाठी वेळ काढून स्वाभिमानी सामान्य माणसापर्यंत प्रत्येक सभेचे ठिकाण,नियोजन व वेळ पोहचवावी जेणेकरून आपल्या जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी बाहेरून येणाऱ्या वरिष्ठ नेत्यांची सभा ही सुसफल व जिवंत होईल.
जसे आपण आताच पाहिले की पैसे देऊन आणलेले कार्यकर्ते फक्त जबरदस्ती टाळ्या वाजवतात परंतु स्वाभिमानाने आलेले कार्यकर्ते प्रामाणिकपणे रिस्पॉन्स देतात व सभा जिवंत ठेवतात तेच खरे प्रत्येक सभेचे उद्दिष्ट असते.