शेंदुर्णी येथे पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम

7

शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी – पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने शेंदुर्णीत पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या शेंदुर्णी औट पोस्ट च्या वतीने विविध उपक्रम करून पोलीस स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या भेटी गाठी घेतल्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांचे पोलिसांना सहकार्य मिळत असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.

नागरिकांनीही पोलिसांना पोलीस स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शेंदुर्णी आऊट पोस्ट च्या वतीने जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना वॉटर बॅगचे मोफत वाटप यावेळी करण्यात आले. यावेळी बोलताना पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे यांनी सांगितले की पोलीस दलाची स्थापना नागरिकांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेली आहे.त्यामुळे नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पोलिसांची भीती न बागडता कोणत्याही अन्याय सहन न करता पोलिसांना तक्रार करावी. 100 नंबर डायल करावा.पोलीस सदैव आपल्यासाठी तत्पर आहे.
शेंदुर्णी आऊट पोस्ट चे उपनिरीक्षक नंदकुमार शिमरे, गुलाबराव पवार पोलीस कॉन्स्टेबल,रवींद्र हडपे पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्ड मनोज गुजर व इतर पोलीस कर्मचारी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.