शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी – शेंदुर्णी सोयगाव रस्ता नवीन व्हावा दुरुस्त व्हावा या मागणीसाठी विविध वाहतूकदार संघटना,नागरिक,त्रस्त वाहतूकदार यांच्या वतीने बुधवारी सकाळी अकरा वाजता स्टेट बँकेजवळ रस्ता रोको आंदोलन होणार आहे.
याबाबतीत सविस्तर वृत्त असे की शेंदुर्णी सोयगाव रोड हा सात किलोमीटर असून त्यात पैकी जामनेर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत केवळ साडेतीन किलोमीटर रस्ता येतो. गेल्या कित्येक वर्षापासून तो ना दुरुस्त आहे लहान मोठ्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्ता नवीन व्हावा रुंदीकरण व्हाव्या त्या ठिकाणी मोरया बनवण्यात याव्या.जेणेकरून लहान-मोठे अपघात होणार नाही.नियमित अपडाऊन करणाऱ्या येजा करणाऱ्या नोकरदारांनाही पाठीच्या मणक्याच्या व्याधी सुरू झालेल्या आहे.
शेंदुर्णी हे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून शासनाने घोषित केलेले आहे. सोयगाव मराठवाड्यातून शेंदुर्णी नेहमी अनेक दिंड्या व भाविक यांची ये जा सुरू असते. चक्रधर स्वामीच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या शेंदुर्णीत महानुभाव पंथाचे असंख्य भाविक त्या ठिकाणी येत असतात परंतु खराब रस्त्याचा त्यांना सामना करावा लागतो.
विशेष म्हणजे ह्याच रस्त्याने लोकप्रतिनिधी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी नित्यनेमाने वावरत असतात.तरीसुद्धा या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शेवटी शिवसेना शहर शाखा, विविध वाहतूकदार संघटना, नागरिकांनी हा रस्ता रोको आंदोलन चा मार्ग निवडला आहे.तरीसुद्धा रस्ता नवीन व दुरुस्त करण्या कामी हालचाल न झाल्यास पुढील आंदोलन आणखी उग्र व तीव्र करण्यात येईल असा इशारा शेंदुर्णी शिवसेना शहर शाखाप्रमुख संजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे.