डॉ . निलम कुमार अग्रवाल , शेंदुर्णी –
आ.ग.र.गरुड माध्य.व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील प्रा.उप प्राचार्य व्ही.डी.पाटील यांच्या नोकरी कालावधी काळातील 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर वयोमर्यादा नुसार ते सेवानिवृत्त होत असून त्यांचा सेवापूर्ती सोहळा संस्थेचे सहसचिव दादासो यु यु पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.याप्रसंगी संस्थेचे सचिव काकासो सागर मलजी जैन,डॉ.किरण सूर्यवंशी,सुधाकर अण्णा बारी, शांताराम बापू गुजर,सहकार महर्षी चेअरमन जिनिंग प्रेस दगडू अण्णा,युवा नेतृत्व भैय्यासाहेब स्नेहदीपजी गरुड, महाविद्यालयीन प्राचार्य संजय भोळे,उपप्राचार्य शाम साळुंखे,माजी कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य एस पी उदार,माजी मुख्या.सहदेव निकम माजी उपशिक्षक भरत पाटील,ए.ए.पाटील,दर्जी फाउंडेशन चे संस्थापक गोपाल दर्जी,सरांचे माजी विद्यार्थी डॉ.अतुल सोनार,
व्ही.डी.पाटील सरांचे चिरंजीव डॉ.विशाल व मुलगी कॉम्पुटर इंजिनियर कुमारी स्नेहल पाटील,व्ही.डी.पाटील सरांच्या धर्मपत्नी ताईसो.वर्षा पाटील त्यांच्या समवेत सरांचा सपत्नीक भव्य,सत्कार विद्यालय,
महाविद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय,पाच ते सात प्राथमिक विभाग,नातेवाईक, आप्तेष्टगन यांच्या वतीने करण्यात आला.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.शिक्षक मनोगत प्रा.शैलेंद्र शेळके,पी.जी.पाटील,प्रा.एस आर पाटील,डॉ.अतुल सोनार यांनी केले तसेच प्रमुख पाहुणे मनोगत संस्थेचे सचिव काकासो सागर मलजी जैन यांनी प्रा.व्ही.डी पाटील,यांच्या जीवन कार्याचा लेखाजोखा मांडला.सत्कारमूर्ती मनोगतात प्रा.व्ही.डी.
पाटील यांनी आपल्या विद्यार्थ्यांप्रती,कनिष्ठ महाविद्यालयाप्रती असलेली श्रद्धा, (लॅबोरेटरी)प्रयोगशाळेबद्दलचे त्यांचे प्रेम त्यांच्या भाषेत त्यांनी मांडले प्रयोगशाळा व विद्यालय माझ्या नेहमीच स्मरणात राहील हे माझ्यासाठी एक विद्येचे मंदिर असल्याचं त्यांनी भावनिक रित्या संबोधन केले.तद्नंतर अध्यक्षीय मनोगतात सहसचिव दादासो.यु यु पाटील,म्हणतात प्रत्येक माणूस गुण आणि दोषांनी भरलेला आहे.जर आपल्या माणसांमध्ये दोष असतील तर गुण आणि दोषांसह माणसाचा स्वीकार करणे आपली नैतिक जबाबदारी आहे.कोणीही व्यक्ती परिपूर्ण नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सविता पवार यांनी केले तर आभार पर्यवेक्षक व्ही.एम शिरपुरे यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक विनोद पाटील,प्रा.महाले,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर प्राध्यापक,प्राध्यापिका,नातेवाईक व आप्तेष्टगन या सर्वांनी परिश्रम घेतले.