लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी शिबीर संपन्न

1230

लोहारा(दिनेश चौधरी) पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे दि.21 रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी शिबिरात एकूण ३२ संशयितांची रॅपिड टेस्ट घेण्यात आली. यापैकी ७ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यापैकी १ महिलेला कोविड सेंटर बाँबरुड येथे पाठविण्यात आले तर उर्वरित ६ जण होम क्वारंटाईन होवून उपचार घेणार आहेत, असे वैद्यकीय अधिकारी डॉ.देवेंद्र पाटील यांनी सांगितले.
यावेळी लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र पाटील, डॉ.प्रदीप खोडपे,डॉ.सोहम काझी,जनसमुदाय अधिकारी डॉ.अक्षय पाटील,डॉ.केयुर चौधरी,आरोग्यसेवक परेश न्हाळदे,वाहनचालक अमोल शेळके,प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शिबिरात खाजगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, मेडिकलचालक,पत्रकार, स्वस्त धान्य दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व संशयित यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली. यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वच स्तरातील लोकांचा अधिक संपर्क असलेल्याची टेस्ट करण्यात येणार असल्याचे डॉ. देवेंद्र पाटील यांनी सांगितले.