अखेर त्या अल्पवयीन,झोपडपट्टीतील मुलीला न्याय मिळाला

1487

 

जावेद शेख पाचोरा ( जिल्हा प्रतिनिधी जळगाव  ) भादवी३६३ पासून सुरू झालेला प्रवास ३०५,३२३,३७६ सह पोस्को कलम ४,५,६, ८ व १२ पर्यंत पोहोचला १९ जुलै रोजी तांबापुर झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीला ती काम करीत असलेल्या ठिकाणाहून पळवून नेले होते त्याबद्दल रामानंद नगर पो स्टे जळगांव ला भादवी ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. २० जुलै रोजी तिचे प्रेम मेहरूण तलावात आढळून आले होते म्हणून प्राथमिक तपासाअंती  भा द वी ३०६ दाखल करण्यात आले व सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांनी चौकशी सुरु ठेवली. चौकशी अधिकारी सोबत समन्वय असल्याने फलश्रुती सदर प्रकरणी मयत अल्पवयीन मुलीची आई सुफीया बी फिर्यादी आहे तिने आपले बंधू आसिफ शाह ,पती भिकन शाह व बहीण शमीम शाह च्या सोबत मानियार बिरदारीचे फारूक शेख यांच्या कडे सदर प्रकरणाचा पूर्ण पणे छडा लावण्या साठी रोज तगादा करीत होते व त्या नुसार शेख हे शवविच्छेदन करणारे डॉक्टर,सीसीटीव्ही फुटेज,चौकशी अधिकारी सपोनी राऊत,पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, सहा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांच्याशी वेळोवेळी समन्वय साधीत असल्याने

शेवटी २८ दिवसात शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर तीला खरा न्याय मिळाला व त्या विशाल भोई विरुद्ध
भादवी ३०५,३२३,३६३,३७६ सह पोकसो कलम४,५,६,८ व १२ लावण्यात आले.

वेळोवेळी यांचे सहकार्य मिळाले – फारुक शेख यांनी सुद्धा सदर प्रकरणी जळगाव शहरातील प्रतिभा शिंदे,गफ्फार मलिक,करीम सालार,बशीर बुऱ्हानी व खास करून तांबापुर परिसरातील हनीफ शहा बापू ,आसिफ शाह,मुख्तार शाह, साबिर शाह, वसीम बापू, जमील शेख, सह अनिस शहा, जुलकर नैन,अनवर खान,अझीझ सिकलीगर, इरफान नूरी, फारूक कादरी,अयाझ अली, यांच्यासह वेळोवेळी पोलीस अधिकारी यांना भेटून निवेदने दिली व चर्चा केली होती

यांचे मानले आभार… 
पोलीस तपास जरी पॉलिसांचे कर्तव्य असले तरी ३२ दिवसात तपास अंतिम चरणी आणून मयत अल्पवयीन गरीब मुलीस न्याय मिळवून दिला म्हणून
फारुक शेख यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांचे सह पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर चौकशी सपोनि राऊत सर सुद्धा आभार मानले.
रामानंद नगर पोलीस स्टेशन ला जाऊन दोघी अधिकाऱ्यांचे शाल देऊन फारूक शेख,बशीर बुऱ्हानी, अनिस शाह व जुलकर नैन यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व सपोनी राऊत सर यांचे शाल देऊन कुतज्ञता व्यक्त करताना फारूक शेख,बशीर बुऱ्हानी,अनिस शाह दिसत आहे .