मनमाड नगर परिषदेच्या दिनदयाल योजने अंतर्गत बैठक संपन्न

200

 

.जावेद शेख पाचोरा – मनमाड नगर परिषदेच्या दिनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजिवीका योजने अंतर्गत ( DAY NULM ) कार्यकारी समिती व टास्क फोर्स समितिची बैठक पार पडली .सदर बैठकिला कार्यकारी समितिचे सर्व सदस्य व बँक आधिकारी हजर होते. सुरवातिला मा मुख्याधिकारी श्री विजयकुमार मुंडे यांनी सर्व उपस्थित अधिकारी यांना दिनदयाल योजना ही फक्त गरिबातल्या गरीब दारिद्य रेषेखालिल लाभार्थी यांचेसाठी आसुन सर्वांनी सामुहीक प्रयत्नाने योजनेचे उद्दीष्ट पूर्ण करन्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर शहर आभियान व्यवस्थापक ( कौशल्य विकास ) श्री संदिप आगोने यांनी योजनेचे सन 2020-21 या वर्षासाठी जे उद्दिष्ट शासनाकडून प्राप्त झाले त्यानुसार योजनेचे समाविष्ट उपांगानुसार स्वयंरोजगार कर्ज , गटाचे कर्ज , व कौशल्य प्रशिक्षण यावर शासनाचे भौतिक उद्दिष्ट नुसार सविस्तर माहिती देऊन कर्ज प्रस्तावा बाबत येणाऱ्या अडचनी व वेळेत कर्ज प्रस्ताव मंजुर करनेबाबत चर्चा केली, तसेच योजनेचे शहर आभियान व्यवस्थापक ( सामाजिक विकास ) श्री विलास कातकडे यांनी महिला बचत गट , शहर फेरीवाला धोरण , शहरी बेघर निवारा, प्रधानमंत्री फेरीवाला आत्मनिर्भर निधी यावर आजपर्यंत झालेल्या कामाबाबत व आलेल्या आडचनी वरती सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पथ विक्रेता समिती सदस्य अकबर शाह यांनी ही फेरीवाले यांचा संदर्भात आपले मत मांडले..बैठाकिमध्ये टास्क फोर्स समिती समोर स्वयंरोजृगारयोजनेच्या 21 कर्ज प्रस्तावांना प्राथमिक मंजुरी देऊन Bank मध्ये दाखल करायला मंजुरी दिली. ककैशल्य प्रशिक्षण संस्था सिमा स्कीला सेंटर च्या सिमा वानखेडे यांनी मागील वर्षी Fation design कोर्स पूर्ण केलेल्या महिला व त्यांचे placemet , प्रशिक्षण बाबत कोर्स पूर्ण केलेल्या महिलांचे आभिप्राय ई वरती सविस्तर माहिती दिली. बैठकिला मुख्याधिकारी श्री विजयकुमार मुंडे , नगर पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक श्री राजेंद्र पाटिल , श्री रुपेश ठाकूर युनियन Bank , श्री दिपक कपूर , महाराष्ट्र Bank , सेंट्रल Bank देना Bank चे प्रतिनिधी , आभियानाचे श्री संदिप आगोने , श्री विलास कातकडे , नगर आभियंता जयश्री मोगल , पालिकेचे शिक्षण विभाग प्रमुख मनिश गुजराथी,प्रकाश दखने , शहर फेरिवाला (पथ विक्रेता ) सदस्य श्री अकबर शाह, वृस्ती स्तर संघाच्या प्रतिनिधी सौ रेखा गांगुर्डे , सिमा वानखेडे योजनेचे समुदाय संघटक श्री श्रीवर्धन कुशारे , स्वयंमरोजगार लाभार्थी उपस्थित होते . शेवटी श्री विलास काताकडे यांनी सर्वांचे आभार मानुन बैठक समाप्त झाली होती.