माणुसकी ला काळीमा फासनारी घटना पोलीस वर्दितील दोन देवदुत आले मदतीला धावुन

1387

 

९०वर्षीय वृध्द झाली कोरोना मुक्त… 

नातेवाइकांनी सांभाळन्यास दिला नाकार साय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे व माणुसकी समुहाच्या मदतीने मदर टेरेसा आश्रमात पुनर्वसनासाठी केले दाखल, 
लोहारा –दिनेश चौधरी,
कच्ची घाटि परीसरातील पीरवाडी जंगल परीसरात ७ आँगष्ट रोजी रात्रीच्या सुमारास ९० वर्षीय आशीर्वाद आजीला रात्री नातेवाईकांनी रीक्षाच्या साय्याने फेकुन दिले होते हि माहिती जगंल परीसरातील काहि नागरिकांना कळाली त्यानी तात्काळ पोलीस स्टेशन चीकलठाणा पोलीसांना माहिती दिली बीट अमलदार अजीनाथ शेकडे व रविंद्र साळवे यांनी रात्री उशिरापर्यंत घाटि रुग्णालयात तीला उपचारासाठी माणुसकी रुग्ण सेवा समुहाच्या मदतीने अँडमेट केले.परंतु त्या आजीचा कोरोना असल्याचे कोविड टेस्ट् मध्ये कळाले तीचावर १९ दिवस उपचार झाले. आता तीचा कोविड रीपोट निग्येट्यु आला आहे व ती आता पुर्णतहा बरी झाली आहे. नातेवाईक यांच्यावर चीकलठाणा येथील साय्यक पोलीस निरिक्षण महेश आंधळे याच्या टिमने नातेवाकांचा शोध घेतला असता हि वृध्द महिला नारेगाव ब्रीजवाडि परीसरात आहे असे समजले त्याच्यावर पोलीस नाईक साळवे यांच्या फिर्यादीवरून माता-पीता जेष्ठ नागरीक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ कलम २४ प्रमाणे गुन्हा दाखल करन्यात आला आहे.परंतु ती आजी आता बरी झाल्यानंतर तीला घाटि रुग्णालयातुन सुट्टी करन्यात आली आहे. आता त्या आजीला ठेवायचे कुठे असा प्रश्न ? अजीत शेकडे व रवींद्र शळके यांना पडला त्यानी माणुसकी ग्रुप चे सुमित पंडित यांच्याशी संपर्क केला असता त्या आजीला ठेवाय कुठे सुमित यांनी वृध्द आश्रम मदर टेरेसा आश्रम व येथे संपर्क साधला असता त्यानीं देखील सांगीतले कोरोनामुळे आँडमीशन बंद आहे परंतु माहितीच्या आधिकाराखाली सुमित यांनी प्रश्न विचारले असता त्या आजीच्या पुनर्वसनासाठी त्यांनी अजीत शेकडे यांना त्या वृध्द महिलेल्या ठेवन्यासाठि मदत केली. त्या आजीला आत मदर टेरेसा आश्रमात पुनर्वसनासाठी ठेवन्यात आले आहे.यावेळी साय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी मदर टेरेसा आश्रमातील इंचार्ज यांच्या पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला. यावेळी अजीनाथ शेकडे.रविंद्र साळवे.सुमित पंडित आदि उपस्थितीत होते.
काय चुकलं आपल्या जन्मदात्याचं! त्यांनी आपल्याला जन्म दिलाय…
सदरील घटना ही माणुसकीला काळीमा फासनारी आहे. अश्या केसेस हॅडल करणे सोपे नाही परंतु अजीनाथ शेकडे व रवींद्र साळवे यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. परतु यानंतर जर समाजातील समाजकंटक आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना त्रास देत असतील तर त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करु. काय गुन्हा आहे हो त्यांचा त्यानी आपल्याला जन्म देवुन चुकी केली आहे का आपन त्यांना त्रास देतो तर
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश आंधळे, चिकलठाणा पोलीस स्टेशन
बेवारस मनोरुग्ण व निराधार यांच्यासाठी संध्या कोरोना चालु आहे हे एकमेव कारना आहे का ?
आम्ही मागच्या आठवड्यामध्ये दोन महिला व एका पुरुषाला येरवडा मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती केले परंतु एक रुग्ण गारज या ठिकाणी नाशीक हायवेवर १७जुलै रात्री अपघात ग्रस्त पेशंट आम्हाला सापडलेला आहे तो मतिमंद असल्याचे साक्रेटीक डॉक्टर देशमुख घाटी रुग्णालय यांनी स्पष्ट केले आहे परंतु तो मतिमंद आहे.त्याला मेटल हाँस्पिटल पुणे येथे नेता येनार नाही त्याला आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी दहा दिवसापासून मी विविध आश्रमे त्यांच्या पुनर्वसनासाठी शोधतोय मला आजही एकही आश्रम कुठे उपलब्ध झालेले नाही प्रत्येक जण सांगतोय की सध्या कोरोना चालू आहे ॲडमिशन बंद आहे म.न.पा. कार्यालय व शासनाचे यासाठी काही सेंटर नाही का? यांना नेमका ठेवायचं कुठे त्यांचं पुनर्वसन कसं होणार हा प्रश्न ? माणुसकी रुग्णसेवा समूह सुमित पंडित यांना पडला आहे.