भातखंडे ग्रामपंचायत समोरील परीसरातील डांबरी रस्त्यावर जमा झाला चिखलाचा खच

1402

जावेद शेख पाचोरा..
पाचोरा-येथुन जवळच असलेल्या भातखंडे खुर्द ग्रामपंचायत परीसरातील डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल
झाल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत.ज्यावेळी ग्रामपंचायत समोरील परीसरात क्राॅक्रेटिकरण करण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते.त्यातुन निघणारी माती हि डांबरी रस्त्यावर टाकण्यात आली होती.गावातील जानकार नागरिकांनी त्यावेळी रस्त्यावरची माती ग्रामपंचायत व ठेकेदारास उचलण्यास सांगितले होते.मात्र त्या वेळेस कोणीही ती रस्त्यावरची माती उचली नाही.
आज ची परस्थिती बघता भातखंडे खुर्द गावात प्रवेश करत्या वेळी व चिखलाचे दर्शन होते.ज्या वेळी ग्रामस्थांनी सांगितल्या प्रमाणे रस्त्यावरची माती उचलण्यात आली असती तर आज रोजी भातखंडे खुर्द येथील ग्रामस्थांना चिखलाचा त्रास सहन करावा लागला नसता.
ग्रामपंचायती ने मजुर कामास लावून रस्त्यावर चा चिखल दुर करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.