शेंदुर्णी येथील राहुल गरुड यांची नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे उप निदेशक म्हणून पदोन्नती

357

प्रतिनिधी शेन्दुर्णी ता.जामनेर,  शेंदुर्णीचा झेंडा दिल्ली येथील संपूर्ण देशाचे (पावर हाऊस) समजल्या जाणाऱ्या नॉर्थ ब्लॉक मध्ये फडकवल्या बद्दल  मा.श्री.राहुल दिलीपराव गरुड (ICAS) यांचे अभिनंदन . अभिमानाची आणि आनंदाची बातमी अशी की आपल्या कार्यकुशलतेने आणि कार्यक्षमतेने अगदी कमी कालावधीत राहुल गरुड भारत सरकारच्या गृहमंत्रालयात असिस्टंट कंट्रोलर ऑफ अकाउंट्स या पदावर राहून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे आणि कार्यतत्परतेने पार पाडल्या. सीमा सुरक्षा दलासह( BSF) देशाच्या निम्म्याहून अधिक पॅरामिलिटरी फोर्स ज्यांना आपण सध्या सेंट्रल आर्मेड पोलीस फॉर्स (CAPF) म्हणून ओळखतो .त्यांच्या आर्थिक (वित्तीय) आणि लेखापरीक्षण संबंधित विभागाचे यशस्वी नेतृत्व केले. प्रामाणिकपणे आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने कामे करुन आपला नावलौकिक त्या विभागात प्रस्थापित केला आणि ह्या सर्व कर्तबगारीचा परिणाम म्हणून मा.श्री.राहुल दिलीप गरुड यांची पदोन्नती झाली . आणि राहुल गरुड आता येथील भारत सरकारच्या वित्त मंत्रालयात (नॉर्थ ब्लॉक दिल्ली) येथे उप निदेशक (आर्थिक कार्य विभाग) म्हणून अत्यंत महत्वाची आणि मोठी जबाबदारी सांभाळतील .सोप्या भाषेत सांगायचे तर राहुल आता संपूर्ण देशाचे बजेट (अंदाजपत्रक) मध्ये महत्वाची भूमिका निभावतील . शेंदुर्णी ,जळगाव , खान्देश नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक अभिमानाची बाब आहे.एक मराठी नाव आता देशाच्या ध्येय निश्चितीत आणि धोरणांच्या आखणीत सहभागी असेल ,

शेन्दुर्णी येथील संपूर्ण गरुड परिवारातर्फे राहुल गरुड यांचे अभिनंदन आणि त्यांच्या नवीन कार्यास ,जबाबदारीस आणि पुढील यशस्वी वाटचालीस  भरभरून शुभेच्छा .

Mr.Rahul Dilip Garud
Deputy Director
Ministry of Finance
Department of Affairs
North Block ,New Delhi