लोहारा येथील समाजसेवक गजानन क्षीरसागर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सत्कार

280

 

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री मुक्ताराम गव्हाणे यांनी केले कार्याचे कौतुक…
लोहारा (दिनेश चौधरी ) पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील समाजसेवक तथा माणुसकी ग्रुपचे जिल्हा अध्यक्ष गजानन क्षिरसागर
यांना समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य मुक्ताराम गव्हाणे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. गजानन क्षीरसागर यांनी केलेल्या निस्वार्थ सेवा कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या छोटेखानी कार्यक्रमाच्या वेळेस अजय देशमुख प्रकाश वाघ, समाज सेवक सुमित पंडित,भाऊसाहेब गोंड तंटामुक्ती अध्यक्ष व गोळेगाव गावकरी ग्रामस्थ उपस्थित होते.