शेंदुर्णी सह परिसरात कापूस ची कवडीमोल भावात खरेदी- शेतकऱ्यांची तक्रार

257

संतोष महाले शेंदूर्णी:- यावर्षी कोरणाचे संकट गडद असल्याने बाहेरच्या खाजगी व्यापाऱ्यांनी खरेदी कडे पाठ फिरवली असून,कापूस वेचणीच्या पूर्वसंध्येवर अवकाळी पावसाने कापसात आद्रता निर्माण झाली असून प्रत थोडी खराब झाली असल्याने खाजगी व्यापारी 4500 ते 4800 रु क्विंटलने कापूस शेतकऱ्यांचा मागत आहे.सर्वच हंगाम एकत्र आल्याने मजुरांची टंचाई भासत असल्याने ह्याच कवडी मोल झालेल्या पांढऱ्या सोन्याला वेचणीसाठी 8 ते 9 रु प्रति किलो मजुरी द्यावी लागत आहे मागील वर्षी आणि या वर्षी पाऊस भरपूर असल्याने बागायती कपाशीचे क्षेत्र या वर्षी वाढले असून कोरडवाहू क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे.या वर्षी ऐन कापूस वेचणीच्या वेडेस पावसाने थैमाल घातल्याने सर्वच शेतकऱ्यांच्या कपाशीच्या कैऱ्या खराब झाल्या आहेत.कापसाची प्रत खराब झाल्याने सद्याच्या कापसाला कवडीमोल म्हणजे 4500 ते 4800 रु प्रति क्विंटल ने खाजगी व्यापारी कापसाची खरेदी करत असल्याने शेंदूर्णी ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. कापूस वेचण्यासाठी पैशाची गरज असल्याने शेतकऱ्यांना कापूस कवडीमोल किमतीत विकावा लागत आहे.तसेच सर्वांची कापूस वेचणी एकत्र आल्याने मजुरांची खूप टंचाई भासत असून 8 ते 9 रु प्रति किलोवर वेचाई गेल्याने आर्थिक संकटातील शेतकरी बुचकळ्यात पडला आहे.गेल्या काही दिवसापासून पावसाने उघड दिल्याने कापूस वेचणीच्या कामाला जोर आला असून मजुरांना 8 ते 9 रु प्रति किलो मजुरी मोजावी लागत आहे. मजुरांना द्यायलाही पैसे सापडत नसल्याने 4500 ते 4800 रु क्विंटल ने शेतकऱ्यांना आपला कापूस विकावा लागत आहे.कापूस जमा करण्याच्या नादात आर्थिक वांदा होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.